Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon : मान्सूनपूर्वीच ७ कृषी परवाने निलंबित; पथकाच्या तपासणीत अनियमिततेसह नियमांचे उल्लंघन

Jalgaon News : मान्सून सुरु होण्यापूर्वी कृषी केंद्रांमध्ये बियाणे, खते विक्रीला सुरवात करण्यात येत असते. शेतकरी शेती तयार करत पेरणीच्या कामाला लागत बियाणे खरेदी करण्यास देखील जणांनी सुरवात केली

संजय महाजन

जळगाव : आगामी मान्सूनच्या अनुषंगाने कृषी विभाग तत्पर झाले आहे. पथकांची नेमणूक करत कृषी केंद्रांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. या तपासणी मोहिमेत कृषी केंद्रांमध्ये अनियमितता तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील ७ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली आहे. मान्सून पूर्वी करण्यात आलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. 

मान्सून सुरु होण्यापूर्वी कृषी केंद्रांमध्ये बियाणे, खते विक्रीला सुरवात करण्यात येत असते. शेतकरी वर्ग देखील शेती तयार करत पेरणीच्या कामाला लागण्याच्या तयारीत आहे. बियाणे खरेदी करण्यास देखील जणांनी सुरवात केली आहे. मात्र बऱ्याचदा बनावट बियाणे, खते विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. या अनुषंगाने कृषी विभागाकडून भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 

नियमांचे उल्लंघन 

दरम्यान विविध कारणास्तव कृषी विभागाने ७ कृषी परवान्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या तपासणीत विविध कृषी केंद्रांमध्ये अनियमितता तसेच नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात ज्यामुळे सदरील परवाना धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. अर्थात मान्सूनची सुरवात होण्यापूर्वीच हि कारवाई झाली आहे. 

तपासणी मोहीम सुरूच 

राज्य शासनाच्या आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने मार्च महिन्यापासून कृषी केंद्रांची तपासणी सुरू झाली आहे. या तपासणीत अनियमिततेसह अन्य बेकायदेशीर बाबी निदर्शनास आल्याने नोटीस बजावून या विक्रेत्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. त्यानुसार अंतिम सुनावणीत ७ कृषी परवाने निलंबित केले आहेत. दरम्यान कृषी विभागाच्या पथकाकडून तपासणी मोहीम अजून देखील सुरु आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शाहू महाराजांचा मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा

भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; महिनाभर फक्त रितेश भाऊंचा बोलबाला, चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमावला?

RCB vs GT, IPL Final : प्रिन्स अन् किंग भिडणार... गुजरातच्या मैदानात आरबीसी कमाल करणार का? पाहा संभाव्य प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT