cotton bollworm 
ऍग्रो वन

कापसावर पुन्हा बोंडअळीचा संसर्ग; वेचणीला अडचण

कापसावर पुन्हा बोंडअळीचा संसर्ग; वेचणीला अडचण

साम टिव्ही ब्युरो

पारोळा (जळगाव) : यंदाचे शेतीचे वर्ष चांगले जाईल, या आशेने शेतकऱ्याने जमिनीत पैसा ओतला. शेतात राबून पिकांना लेकराप्रमाणे मोठे केले. मात्र, प्रारंभीच पावसाने डोळे वर करून आशेवर पाणी फिरवले. तब्बल दीड महिन्यानंतर पावसाने दडी मारल्याने जमिनीवरची पिके जमिनीत गेली. त्यात आता एन वेचणीवर आलेल्या कापसावर बोंडअळीचा संसर्ग झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. (jalgaon-news-Re-infestation-of-cotton-bollworm-Difficulty-in-selling)

एक नवे दर दोन तीन वेळा मरझळ करून शेतकऱ्याने पिके मोठी केली. मात्र पुन्हा पावसाने कुठे जास्त तर कुठे कमी प्रमाणात हजेरी लावल्याने पिके जेमतेम वाढली. मशागतीनंतर उत्पन्न चांगले येईल, या आशेने शेतकऱ्यांनी पिकाची निगा राखली. मात्र पुन्हा शेतकऱ्यांच्या नशिबी अतिवृष्टी, गुलाब वादळ व अवकाळीने घात केला. पाण्यात कपाशी की कपाशीत पाणी अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली. त्यातच वेचणीच्या वेळी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने कापसाचे वजन कमी होऊन उत्पन्नाची आवक कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरल्याचे दिसून येत आहे.

नाइलाजास्तव कपाशीची नांगरणी

कापसाच्या भावा मुळेच शेतकऱ्यांना नाम मात्र आर्थिक बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. तर शेतात कापूस दिसत नसल्याने वेचणी मंदावली असून हातावर पोट भरणाऱ्या मजुरांकडे काम नसल्याचे ते कामाच्या शोधात फिरताना दिसत आहेत. शेतात कापूस वेचताना कापसाच्या बोंडावर अळींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने वेचणी मंदावली असून शेतकरी नाइलाजास्तव उभ्या कपाशीच्या पिकात नांगरणी करून हरभरा पिके घेत आहेत तर काही शेतकरी पशुधनासाठी वन चराई म्हणून वापर करीत आहेत.

कापसाला भाव मात्र आवक घटली

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा खाजगी व्यापारी हे कापूस प्रतिक्विटंल ८००० ते ८५०० घेत आहेत. भाव आहे, पण शेतकऱ्यांच्या शेतात कापूस नसल्याने भाव वाढ होऊन देखील उपयोग नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. तालुक्यात काही शेतकरी शेतात फरदड घेऊन आहे त्या कापसाला फवारणी, वखरटी करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates : नितीश कुमार की तेजस्वी यादव, बिहारचा कौल कुणाला? लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Bihar Election Result: NDA की महाआघाडीला, बिहारमध्ये कोणाची सत्ता बनणार? नितीश कुमार की तेजस्वी यादव कोणाला मिळतेय पसंती, जाणून घ्या

Sidramappa Patil Passes Away : माजी आमदार आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Friday Horoscope : प्रियकराबरोबर बोलताना काळजी घ्याल; या राशींच्या व्यक्तींना दुरावा सहन करावा लागणार

Maharashtra Politics: विदर्भात राजकीय उलथापालथ! भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT