Farmer Saam tv
ऍग्रो वन

शेती नांगरणीसाठी तिच्‍या हाती बैलजोडीची दोरी

शेती नांगरटीसाठी तिच्‍या हाती बैलजोडीची दोरी

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : केवळ मोठ्या पदावर काम केले म्हणजेच महिलांचे कर्तृत्व दिसते असे नाही; तर शेतामध्ये राबणाऱ्या हाताला बरोबरीने काम करून मी देखील शेतात कमाई करू शकते. याचे प्रत्यक्ष उदाहरण वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील चित्राबाई जगताप व संभाजी जगताप दांपत्याचे आहे. विशेष म्हणजे शेतात मशागत करण्यापासून पेरणी (farmer) करण्यापर्यंत सर्व कामे करणाऱ्या, गाई- म्हशींचे सुमारे 40 लिटर दूध स्वतः काढणाऱ्या, पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतात किटकनाशकाची फवारणी करून अधिकाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या बळीराजाच्या लक्ष्मीच्या हाताला अधिकच यश आहे. (jalgaon news pair of oxen's rope in women hand for plowing)

वरखेडे (ता.चाळीसगाव) येथील चित्राबाई संभाजी जगताप हे आपल्या कुटंबासह दरेगाव रसत्यालगत असलेल्या (Jalgaon News) शेतातच राहतात. त्यांचे पती संभाजी यांना माणसाप्रमाणे शेती कामात मदत करत असतात. त्यांच्या कामाची हुन्नरी हा चर्चेचा विषय ठरला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ येत आहे. बळीराजाला शेती तयार करण्याचे वेध लागले आहे. डिझेलचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वच क्षेत्रांना त्याचा फटका बसत आहे. ग्रामीण भागातील शेती व्यवसायही यातून सुटला नाही. डिझेलचे दर वाढले आणि शेती मशागतीचे सध्या महत्त्वाचे असे साधन ट्रॅक्टरच्या मशागतीचे दरही वाढल्याने पिकांना होणारा खर्च व शेतमालाला मिळणारा बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. या सर्व गोष्टी पाहाता या शेतकरी महिलेने बैलजोडीच्या साहाय्याने चांगली मशागत करायची खुनगाठ मनाशी बांधली.

चित्राबाईनी बैलाने केली मशागत

पूर्वी शेतीची कामे बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी अशी सर्व कामे केली जायची. यामध्ये कोणताही खर्च शेतकऱ्यांना येत नव्हता. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांनी कामे व्हायची. मात्र या वाढत्या महागाईमुळे चित्राबाई व त्यांचे पती संभाजी यांनी निर्णय घेतला की, आपण बैलजोडीच्या साहाय्याने शेती तयार करायची यासाठी स्वतः चित्राबाई यांनी बैल चालवली व त्यांचे पतीने लोंखडी नागंरच्या साह्याने दोन दिवसात आडीच एकर शेती नागंरटी केली. चित्राबाई यांची हिम्मत पहाता अनेकांनी त्यांचा असा आदर्श घ्यावा; हे उत्तम उदाहरण त्यांनी शेतकरी महीलांसमोर ठेवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: सोलापूरकरांनी कोणाला दिला कौल? विजयाची वैशिष्ट्ये काय?

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

SCROLL FOR NEXT