Cotton  saam tv
ऍग्रो वन

Cotton Crop: खानदेशात केवळ १२ लाख गाठी; बोंडअळींचा परिणाम

खानदेशात केवळ १२ लाख गाठी; बोंडअळींचा परिणाम

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : राज्यात यंदा अतिवृष्टीने कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्या मुळे एकरी उत्पादनात कमालीची घट झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कपाशी उत्पादनाचा घास अतिवृष्टीने हिरावून नेला. या मुळे यंदा बाजारात कपाशीची आवक कमी आहे. याचा परिणाम खानदेशात तयार होणाऱ्या कपाशीच्या (Cotton) गाठींवर होणार आहे. वरील कारणांमुळे २५ ऐवजी १५ लाख गाठी यंदा तयार होणार होत्या; त्यात आता कपाशीवर बोंडअळी (Bondworm on cotton) आल्याने तीन लाख गाठींचे उत्पादन घटणार आहे. या वेळी खानदेशातील गाठींचे उत्पादन केवळ १२ लाख गाठी तयार होणार असल्याची माहिती जिनिंग प्रेसिंगच्या संचालकांनी दिली. (jalgaon news Only 12 lakh bales of cotton in Khandesh The effect of bollworm)

राज्यात दर वर्षी ९० ते ९२ लाख कपाशीच्या गाठी तयार होतात. यंदा त्या केवळ ७५ लाख गाठी तयार होतील, असा अंदाज खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने वर्तविला होता. खानदेशात दर वर्षी २३ ते २५ लाख कपाशीच्या गाठी तयार होतात. यंदा मात्र कपाशीची आवक कमी आहे. अनेक शेतकऱ्यांकडे कापूस (Cotton Crop) नाही. जो आहे तो अत्यल्प आहे. यामुळे १५ लाख गाठींचे उत्पादन होणार होते. मात्र, अकाली पाऊस, कपाशीवर आलेले बोंडअळीचे संकट यामुळे एकूणच कपाशीचे उत्पादन घटले आहे. बाजारात अत्यल्प कपाशी विक्रीस येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) गुजरातला कापूस नेला आहे व नेत आहेत. असे असले तरी कपाशीला नऊ हजारांच्या वर दर यंदा मिळत आहे.

कापूस तेजीत

कपाशीला दर वर्षी चार हजार ५०० ते पाच हडार ६०० असा दर मिळतो. गत वर्षी जून महिन्यात सात हजारांचा दर मिळाला होता. यंदा मात्र आठ हजार ५०० ते नऊ हजारांपर्यंत कपाशीला दर मिळत आहे. काही ठिकाणी दहा हजारांपर्यंत चांगल्या कपाशीला भाव आहे. हमीभावापेक्षा अधिकचा दर खासगी व्यापारी देत असल्याने केंद्र शासनाने सीसीआयची केंद्रे यंदा सुरू केलीच नाहीत. यामुळे यंदा कापूस तेजीत आहे. खानदेशात सध्या शंभर जिनिंग प्रेसिंग मिल्स सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यात ५५ ते ६० मिल्स सुरू आहेत. त्याद्वारे गाठी तयार करण्याचे कामे होत आहे.

गुजरातमध्ये मागणी अधिक

महाराष्टातून (Maharashtra) कपाशीला गुजरात राज्यात अधिक मागणी आहे. गुजरातचे (Gujrat) व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कापसाची खेडा करीत आहेत. नेमके किती शेतकरी, किती प्रमाणात कपाशी गुजरातला पाठवितात, यावर खानदेशातील कापसाच्या गाठींचे उत्पादन अवलंबून असते. यंदा गुजरातला किती शेतकरी कापूस पाठवतील, यावर गाठींचे उत्पादन अवलंबून राहील.

खानदेशात यंदा केवळ १५ लाख गाठी तयार होणार होत्या; आता कपाशीवर बोंडअळी आल्याने त्यात आणखी तीन लाख गाठींची घट निर्माण होईल. कारण गाठींसाठी चांगला कापूस लागतो. यंदा कपाशीला चांगला भाव आहे. एका गाठीला ३५ हजारांचा दर मिळतो.

-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी ओनर्स असोसिएशन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: सायन पनवेल महामार्गावर मुसळधार पाऊस

Jio Recharge Plan: जिओचा ९० दिवसांचा किफायतशीर प्लॅन, यूजर्संना मिळालं अमर्यादित डेटा

Tejaswini Lonari: गुलाबी साडी अन् लाली लाल लाल...; पिंक फ्लोरल साडी मधला तेजस्विनीचा मनमोहक लूक

Beed News : मध्यरात्री पावसाच जोर वाढला, परळीत कार पुराच्या पाण्यात गेली वाहून, पाहा थरारक व्हिडिओ

Maharashtra Tourism: शांत आणि थंड ठिकाणी फिरण्याचा प्लान करताय? मग रत्नागिरीमधील 'हे' हिडन जेम ठरेल बेस्ट ऑप्शन

SCROLL FOR NEXT