Cotton Seeds Saam tv
ऍग्रो वन

शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार; ‘एचटीबीटी’ कापूस बियाणे बाजारात

शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार; ‘एचटीबीटी’ कापूस बियाणे बाजारात

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : मागील वर्षीच्या खरीप हंगामात कापसाला ८ ते १० हजारांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळाला. यामुळे यंदा कपाशीच्या पेऱ्यात वाढ होणार आहे. सव्वापाच लाखांपेक्षा हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा यंदा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर काही बियाणे कंपन्यांनी ‘एचटीबीटी’ कापसाचे बोगस बियाणे बाजारात आणले आहे. याद्वारे शेतकऱ्यांच्या (Farmer) फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. (jalgaon news farmer HTBT cotton seeds in the market)

कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की बीटी कापसाच्या बियाण्यांत परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशील असणारे Transgenic Glyphosate/Herbicide Tolaerant trait वापरून अनेक बोगस कंपन्या, व्यक्ती, संस्था कापूस बियाणे विकत आहेत.

जमिनीची सुपीकता नष्‍ट होण्याचा धोका

‘एचटीबीटी’ या अवैध कापूस बियाण्यांपासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका आहे. नागरिकांच्या अन्नसुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, येत्या खरीप हंगामात कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी अशा वाणांची लागवड करू नये, या वाणाची अवैध व विनाबिलाने खरेदी करू नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करीत असल्याचे दिसून आल्यास ०२५७-२२३९०५४ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे. बोगस बियाणे विक्रेत्यांचा शोध घेण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. ही पथके बोगस बियाणे विक्रेत्यांचा शोध घेत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT