Bogus Seeds Saam tv
ऍग्रो वन

Bogus Seeds : जळगाव जिल्ह्यात १७ लाखांचे बोगस बियाणे जप्त; कारवाईनंतर गुन्हा दाखल

Jalgaon News : रब्बी हंगामातील पीक काढणी अद्याप सुरु आहे. जमीन तयार केल्यानंतर बागायतदार शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कपाशी लागवड करतात. त्या अनुषंगाने बाजारात बियाणे दाखल होऊ लागले

Rajesh Sonwane

चोपडा (जळगाव) : उन्हाळी कापसी लागवडीच्या अनुषंगाने बियाणे खरेदीस अद्याप अवधी आहे. असे असताना देखील बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचा सुळसुळाट सुरु झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चुंचाळे येथे १७ लाख ८२ हजार २०० रुपयांचे एचटीबीटी कंपनीचे बोगस कापूस बियाणांची एक हजार २७३ पाकिटे जप्त करण्याची कारवाई कृषी विभागाच्या पथकाने केली आहे. 

रब्बी हंगामातील पीक काढणी अद्याप सुरु आहे. पीक काढणी करून जमीन तयार केल्यानंतर बागायतदार शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कपाशी लागवड करत असतात. त्या अनुषंगाने बाजारात बियाणे दाखल होऊ लागले आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याचे सुरु झालेले नाही. असे असताना देखील बोगस बियाण्यांचे पाकीट बाजारात आणले जात आहेत. 

छापा टाकून प्रतिबंधित पाकीट जप्त 

जळगावच्या चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे सापळा रचुन हि कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा कृषी विभागाला बोगस बियाण्यांबाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने सापळा रचत चुंचाळे येथील नितीन नंदलाल चौधरी यांच्या अकुलखेडा रस्त्यावरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून प्रतिबंधित एचटीबीटी कापसाच्या बियाणाची एक हजार २७३ पाकिटे जप्त केली. याबाबत जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदलाल चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

यंदाची पहिली कारवाई
चोपडा तालुक्यासह परिसरातील काही गावांमध्ये गावांमध्ये सर्रास बोगस बियाणे विक्री होत असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते; असे बियाणे खरेदी केल्यानंतर त्याचे कोणतेही बिल किंवा पावती दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनाही कोणाविरोधात ओरड करता येत नाही. तालुक्यात आणखी काही जणांकडे बोगस बियाणे असण्याची शक्यता असून, त्याकडे जिल्हा भरारी पथकाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT