Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : पिकांच्या संरक्षणासाठी कुंपणाला वीज प्रवाह; स्पर्श झाल्याने तरुणाचा मृत्यू

Jalgaon Yawal News : शेतात असलेल्या पिकाचे मोकाट गुरांपासून संरक्षण करण्यासाठी कोळी यांनी बॅटरीवर चालणारे झटका मशिनचे तारेच कुंपण केले आहे.

साम टिव्ही ब्युरो

यावल (जळगाव) : बटाईने दिलेल्या शेतात जनावरांपासून शेत पिकाचे संरक्षण करण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या (Yawal) झटका मशिनचे तारांचे कुंपण केले आहे. या प्रवाही ताराच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने ३४ वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक (Death) मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra News)

जळगाव जिल्ह्यातील यावल शहरातील शेतकरी प्रशांत मुरलीधर महाजन यांचे शेत गट क्रमांक ७२४/२ हे शेती क्षेत्र सचिन रमेश कोळी (रा. संभाजी पेठ, यावल) यांनी बटाईने केले आहे. या शेतात असलेल्या पिकाचे मोकाट गुरांपासून संरक्षण करण्यासाठी कोळी यांनी बॅटरीवर चालणारे झटका मशिनचे (Electric shock) तारेच कुंपण केले आहे. शेताच्या सभोवताली लावलेल्या या तारांच्या कुंपणावर शुक्रवारी विशाल रमेश मेढे (वय ३४, रा.अडावद, ता. चोपडा) हा तरुण मृत स्थितीत आढळून आला. तेव्हा या बाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रात्री पोलिस ठाण्यात मृत तरुणाच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी सचिन कोळी यांच्या माहितीवरून यावल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसीम तडवी तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Girija Oak Photos: अभिनेत्री गिरीजा ओकचं नशीब चमकलं, एका रात्रीत बनली 'नॅशनल क्रश'

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा जोरदार धक्का; हजारो कार्यकर्त्यांसह जालन्यातील बडा नेता शिवसेनेत जाणार

परपुरूषाशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी; बायकोचा आयएएस नवऱ्यावर गंभीर आरोप, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

Maharashtra Live News Update: अजितदादांनी राजीनाम द्ययला हरकत नाही-बच्चू कडू

Govinda Health Update : गोविंदा अचानक बेशुद्ध कसा झाला? डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्यानं सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT