Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: लासूर येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने संपविले जीवन

लासूर येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने संपविले जीवन

साम टिव्ही ब्युरो

चोपडा (जळगाव) : तालुक्यातील लासूर येथील तरुण शेतकऱ्याने (Farmer) सततची नापिकी व कर्जाला कंटाळून बुधवारी (ता. ७) दुपारी एक ते दीडच्या सुमारास स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. (Breaking Marathi News)

गणेश बाळासाहेब पाटील (वय ४५) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत चोपडा (Chopda) ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लासूर (ता. चोपडा) येथील गणेश बाळासाहेब पाटील या शेतकऱ्याकडे सात ते आठ बिघे जमीन असून, त्यांच्या डोक्यावर बँकेचे तीन ते चार लाखाचे कर्ज तसेच सोसायटीचे कर्ज होते.

कर्ज फेड व मुलांचे शिक्षणाची विवंचना

सततची नापिकी व कर्ज फेडायचे कसे, मुलांचे शिक्षण कसे करणार या विवंचनेत ते होते. या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली (Jalgaon News) असल्याचे नातेवाईक यांनी माहिती दिली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, असा परिवार आहे. ते वेळोदे येथील सुप्रभात ॲग्रोचे संचालक अरुण सोनवणे यांचे शालक होत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra News Live Update : डॉ. अमोल कोल्हे यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आग्रही मागणी

भाच्याचा संसार मोडल्याचा प्रचंड राग! जंगलात नेऊन सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड; पुण्यात हत्येने खळबळ

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

SCROLL FOR NEXT