Onion  
ऍग्रो वन

ढगाळ वातावरणाने कांदा रोपाचे नुकसान; गव्हाच्या पेरण्याही लांबणार

ढगाळ वातावरणाने कांदा रोपाचे नुकसान; गव्हाच्या पेरण्याही लांबणार

संजय महाजन

जळगाव : मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शिवाय दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. याचा फटका पिकांना बसत आहे. प्रामुख्‍याने आता होणाऱ्या कांदा लागवडीला याचा फटका बसत असून शेतात टाकलेले कांद्याचे रोप ढगाळ वातवरणामुळे जळत असल्‍याने शेतकरीचे (Farmer) यात नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांनी उन्‍हाळी कांद्याची लागवड करच्‍या दृष्‍टीने महागडी बियाणे आणून शेतात टाकली होती. परंतु, ढगाळ वातावरणामुळे कांद्याचे रोप व लावलेल्‍या कांद्याची पात पिवळी पडून करपू लागली आहे. कांद्याचे महाग बी, रोपे विकत घेऊन शेतात लावले. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. कांदा पिक पिवळे पडत आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणवर नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

कांदा रोप वाया

जळगाव जिल्ह्यात बुधवारी दिवसभर राहिलेले ढगाळ वातावरण आणि रिपरिप पावसामुळे उन्हाळी लागवडीचा कांदा रोपांना मोठा फटका बसणार आहे. कांदा रोपांवर बुरशीजन्य पडण्याची शक्यता आहे. रोगाचाही विळखा पाण्याची शक्यता आहे. शेतात टाकलेले कांद्याचे निम्‍मेहून अधिक रोप वाया गेल्‍याचे वेल्‍हाडे (ता. भुसावळ) येथील शेतकरींकडून सांगितले. आता अजून दोन दिवस असेच वातावरण राहिल्‍यास संपुर्ण कांद्याचे पिक वाया जाणार आहे.

गव्‍हाची पेरणीही लांबणार

कांदा रोपाला फटका बसत असून दुसरीकडे गव्हाच्या पेरण्यावर देखील अवकाळी पावसाचा परिणाम जाणवणार आहे. या आठवड्यात गव्‍हू पेरणीला सुरवात झाली होती. काही शेतकरींची गव्‍हू पेरणी झाली. मात्र बहुतांश शेतकरींची लागवड करणे बाकी राहिले आहे. यामुळे आता या गव्‍हाच्‍या पेरणी लांबणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : 'भाजप-एमआयएम' युतीचा दुसरा अंक, MIM च्या सर्वच नगरसेवकांचं भाजप नेत्याच्या मुलाला समर्थन

Crime: घरी जाणाऱ्या तरुणीचं अपरहण, जबरदस्ती दारू पाजली; ६ जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचं सोज्वळ सौंदर्य...

Maharashtra Live News Update : गुंड गजा मारणेला १५ आणि १६ तारखेला पुणे शहरात येण्यास परवानगी

Railway News : मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट! आसनगाव-कसारा नव्या मार्गिकेबाबत सॉलिड अपडेट!

SCROLL FOR NEXT