Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी..कापसाचे दर एक हजाराने कमी

शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी..कापसाचे दर एक हजाराने कमी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळावा, यासाठी ९० टक्के कापूस घरात ठेवला आहे. असे असताना, कापसाच्या दरात तब्बल एक हजारांची घसरण झाली. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कापूस दराबाबतची (Cotton Price) चिंता आणखी वाढली आहे. शेतकऱ्यांना दराबाबत आशा होती, त्यावर पाणी फिरण्याची चिन्हे आहेत. (Maharashtra News)

मागील आठवड्यात आठ ते साडेआठ हजारांचा दर कापसाला (Cotton) होता. यामुळेच ‘सीसीआय’ने ८ आठ हजार ४०० रुपये दराने खुल्या बाजारात खरेदी सुरू करण्याचे सांगितले होते. आता मात्र कापसाचे दर कमी झाल्याने ‘सीसीआय’ काय दराने कापूस घेणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये (Farmer) उत्सुकता आहे.

९५ टक्‍के कापूस घरातच पडून

यंदा कापसाचा पेरा ११० टक्के झाला होता. परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी कपाशीचे नुकसान झाले असले, तरी चांगले उत्पादन हाती आले होते. बाजारात कापसाला आठ ते नऊ हजारांचा दर होता. मात्र, शेतकरी कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळावा, यासाठी कापूस विक्रीस आणीत नव्हते. ९५ टक्के कापूस घरात असताना, शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणावा, यासाठी जिनिंग चालक कापसाला दर देत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

16 अधिकाऱ्यांचं नशीब फळफळलं! केंद्र सरकारकडून IAS पदोन्नतीला मंजुरी; यादी आली समोर

दिवाळीपूर्वी मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार? मुरुगन यांच्यानंतर आणखी चार मंत्री राजीनामा देणार, चर्चांना उधाण

Leg Pain After Garba : नवरात्रीत गरबा खेळून पाय दुखले? 'या' सोप्या घरगुती उपायांनी २ मिनिटांत मिळेल आराम

Maharashtra News Live Update : Mumbai: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात बिबट्यांची दहशत

Amla and aloe vera juice: सकाळी सकाळी रिकाम्या पोटी आवळा आणि कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास काय होईल? वाचा

SCROLL FOR NEXT