जळगाव : आंतरराष्ट्रीय कापूस बाजारपेठेत खंडीचे दर अचानक वाढल्याने जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात (Cotton Price) व्यापाऱ्यांनी वाढ केल्याचे चित्र होते. चार दिवसांपूर्वी कापसाचे मार्केट डाउन होऊन दर सात हजार ३०० ते सात हजार ५०० पर्यंत खाली होती. त्यात वाढ होऊन आठ ते साडेआठ हजारांचा दर कापसाला मिळाला आहे. यामुळे कापूस मार्केट तेजीत येण्याची शक्यता वाढली आहे. (Letest Marathi News)
शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला दर मिळावा, यासाठी राज्यात ‘सीसीआय’तर्फे खुल्या बाजारात कापूस खरेदी केंद्रे सुरू होती. असे असताना चार दिवसांपूर्वी देशभरातील कापसाचे दर गडगडून कापूस मार्केट ‘क्रॅश’ झाले. यामुळे शेतकऱ्यांनी राज्यभरात कापूस विक्री थांबविली होती. कापूसच खरेदी केंद्रावर येत नसल्याने नगर, नंदुरबार केंद्र ओस पडली आहेत. इतर केंद्रांची हीच स्थिती आहे.
दहा हजारावर अपेक्षा कायम
कापसाला खासगी व्यापारी आठ ते साडेआठ हजार दर देत होते. मात्र, कापसाला दहा ते १३ हजारांचा दर मिळावा, अशी अपेक्षा करीत शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणण्याचे टाळले आहे. कापसाचा हमीभाव सहा हजार ३८० रुपये आहे. व्यापारी आठ ते साडेआठ हजार दर देत आहेत. कापूस उत्पादक दहा ते तेरा हजारांचा दर मागत आहेत. यामुळे कापूस बाजारात येत नसल्याने कापूस बाजार एकदम थंडावत असल्याची स्थिती होती.
खंडीचे दर वाढले
कापूस उत्पादकांची होणारी कोंडी फोडण्यासाठी ‘सीसीआय’ने खुल्या बाजारात उतरून कापूस खरेदीचा निर्णय घेत आठ हजार ४०० रुपये दर दिला होता. सोमवारपासून कापसाचे मार्केट क्रॅश झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात खंडीचे दर ५२ ते ५७ हजार झाले. यामुळे कापसाच्या दरात आणखी घसरण झाली. आज मात्र आंतरबाजारपेठेत कपाशीला मागणी वाढून खंडीचे दर ६१ ते ६२ हजारांवर गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यानी आठ ते साडेआठ हजारांचा दर कपाशीला दिला आहे. यामुळे कापूस उत्पादक बाजारात कापूस विक्रीस आणतील, अशी आशा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.