Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : दोन वर्षांपासून घरात ठेवलेला कापूस विक्रीला; सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनाच्या रांगा

Jalgaon News : दोन वर्षापासून घरात ठेवलेला कापूस उत्पादक शेतकरी भाव वाढीच्या प्रतीक्षेत होता. मात्र भाव वाढ होत नसल्यामुळे मिळेल तेवढा मोबदला घेऊन शेतकऱ्यांनी आज कापूस विक्रीला काढलेला आहे

संजय महाजन

जळगाव : शेतकऱ्याचे पांढर सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही. मागील दोन वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस घरात साठवणूक करून ठेवला होता. दोन वर्षानंतर कापूस विक्रीसाठी काढला आहे. कापूस विक्रीसाठी सकाळपासूनच शेतकरी दाखल झाले आहेत. यामुळे जळगावच्या सीसीआय केंद्रावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

गेल्या दोन वर्षापासून घरात ठेवलेला कापूस उत्पादक शेतकरी भाव वाढीच्या प्रतीक्षेत होता. मात्र भाव वाढ होत नसल्यामुळे मिळेल तेवढा मोबदला घेऊन शेतकऱ्यांनी आज कापूस विक्रीला काढलेला आहे. दिवाळीपासून कापूस विक्रीला सुरवात झाली असून सुरवातीपासूनच चांगला दर शेतकऱ्यांना मिळत नाही. जळगावच्या सीसीआय केंद्रावर आज सकाळपासूनच शेतकऱ्यांच्या कापसाच्या वाहनांच्या लांबच-लांब रांगा पहावयास मिळत आहेत. काही शेतकरी गाड्या घेऊन मुक्कामी तर काही शेतकरी सकाळीच सीसीआय केंद्रावर दाखल झाले आहेत.

कापसाला ७४२१ रुपये भाव

खासगी व्यापाऱ्यांकडून कापसाला कमी भाव दिला जात आहे. मात्र सीसीआय केंद्रावर ७ हजार ४२१ रुपये इतका भाव मिळत आहे, यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रावर कापूस विक्रीला आणला आहे. अजूनही शेतकरी कापूस विक्रीसाठी काढत नसल्याने छोटे मोठे जिनिंग उद्योग मात्र संकटात सापडले असले तरी बळीराजाला देखील अजून भाववाढीची प्रतीक्षा दिसून येत आहे.

१० हजाराचा भाव मिळण्याची अपेक्षा 
मागील दोन वर्षांपासून कापसाचा चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाव वाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला नाही. घरातच कापसाची साठवणूक करून ठेवली होती. यंदा देखील भाव वाढीचे चित्र नाही. यामुळे काही शेतकरी कापूस विक्रीसाठी काढत आहे. मात्र कापसाला दहा हजार रुपये भाव मिळण्याची शेतकऱ्याला अपेक्षा होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

Pune News: MPSC च्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT