Nylon Manja : नायलॉन मांज्यामुळे एकाचा कापला गळा व बोटे; नाशिकच्या सिन्नरमधील घटना

Nashik News : दुचाकीने संगमनेर नाका परिसरातून जात असतांना पतंगासाठी वापरला जाणारा नायलॉन मांज्या त्यांच्या गळ्यात अडकला. मांजा हाताने काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हाताची दोन्ही बोटे कापली
Nylon Manja
Nylon ManjaSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरावर बंदी असताना देखील याचा वापर होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. या नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणाऱ्या एकजणाचा गळा व दोन बोटे कापली गेली आहेत. सदरची घटना नाशिकच्या सिन्नर परिसरात घडली आहे. 

नाशिकच्या सिन्नर येथील सरदवाडी रस्त्यावरुन दुचाकीवरुन जाणारे नंदकुमार निगोजी मोटे (वय ५०) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नंदकुमार मोटे हे दुचाकीने संगमनेर नाका परिसरातून जात असतांना पतंगासाठी वापरला जाणारा नायलॉन मांज्या त्यांच्या गळ्यात अडकला. गळ्यात अडकलेला मांजा त्यांनी हाताने काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या हाताची दोन्ही बोटे कापली गेली. 

Nylon Manja
Onion Price : कांदाच रडू लागला! दर घसरले; नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत क्विंटलला किती भाव?

गळ्यालाही झाली जखम 

तर गळ्यात अडकलेला मांजा काढत असताना गळ्याला देखील खोल जखम होऊन ते गंभीर झाले. यानंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या गळ्यावर ३५ टाके टाकण्यात आले. एकुणच बंदी असूनही मकर संक्रात पुर्वीच नायलॉन मांज्याचा वापर होत असल्याच समोर आले आहे. 

Nylon Manja
Grapes : बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जीएसटी मुक्त करत बेदाण्याला कृषी मालाचा दर्जा

कारवाईनंतरही मांजाचा वापर 

नायलॉन मांजा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविले जात असून यासाठी बाजारात मांजा विक्रीसाठी येत आहे. नाशिकमध्ये यापूर्वी मांजा विक्री करणाऱ्यांना पकडत कारवाई करण्यात आली होती. यानंतरही मांजा विक्री होऊन वापरला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com