Grapes : बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जीएसटी मुक्त करत बेदाण्याला कृषी मालाचा दर्जा

Pandharpur news : द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा करातून वगळण्यात यावा या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले असून मनुका करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली
Grapes
Grapes Saam tv
Published On

पंढरपूर : द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकारने बेदाण्याला आता कृषी मालाचा दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय बेदाणा आता जीएसटी मुक्त करण्यात आला असून परिषदेमध्ये बेदाण्यावर आकारला जाणारा पाच टक्के जीएसटी रद्द केला‌ आहे.

द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा करातून वगळण्यात यावा; अशा महाराष्ट्राच्या मागणीला यश आले असून वस्तू सेवा कर परिषदेतमध्ये मनुका करमुक्त करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राजस्थान मधील जैसलम येथे नुकतीच जीएसटीची परिषद झाली. त्यामध्ये बेदाणा जीएसटी मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Grapes
Fake Fertilizer Sale : खत विक्रेत्यावर कॉपी राईटचा गुन्हा दाखल; कंपनीचा लोगो वापरून बनावट खत विक्री

१८ टक्के जीएसटी रद्द 

याशिवाय शीतगृहात ठेवण्यात येणाऱ्या बेदाण्यावरील १८ टक्के जीएसटी ही रद्द करण्यात आला आहे. यापूर्वी बेदाण्याचा कमोडिटी मार्केटमध्ये समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांना यांचा फटका सहन करावा लागत होता. केंद्र सरकारने द्राक्षापासून तयार होणाऱ्या बेदाण्याला कृषी मालाचा दर्जा दिल्याने बेदाणा करमुक्त झाला आहे. याचा फायदा आता शेतकऱ्यांना होणार आहे. 

Grapes
Onion Price : कांदाच रडू लागला! दर घसरले; नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीत क्विंटलला किती भाव?

नाशिक, सांगली, सोलापूरमध्ये अधिक उत्पादन 

प्रामुख्याने नाशिक, सांगली व सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन होत असल्याने येथे बेदाणा देखील मोठ्या प्रमाणात तयार केला जात असतो. आता बेदाणा करमुक्त झाल्याने नाशिक, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील बेदाणा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com