Chosaka saam tv
ऍग्रो वन

चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखानाची मालमत्तासह बँक खाते सील

साम टिव्ही ब्युरो

चोपडा (जळगाव) : चोपडा शेतकरी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे घेणे असलेल्या २०१४- १५ च्या हंगामातील ऊसाच्या बाकी असलेले ६०० रूपये प्रतिटन हे व्याजासकट देणेचा आदेश उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये दिलेला होता. कारखान्यावर महसुली वसूली प्रमाणपत्राप्रमाणे कार्यवाही झालेली असताना सदर रक्कम न दिल्याने ती रक्कम व्याजासह देण्यात कसूर केली; म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्‍याची (Chopda Sugar Factory) मालमत्तेसह बँक खाते सील (जप्त) करण्याचे आदेश तहसीलदार अनिल गावीत यांनी दिले. चहार्डी मंडळ अधिकारी एस. एल. पाटील, तलाठी दिपाली ईशी यांनी ही कारवाई केली. (jalgaon news Chopda sugar factory property with bank account sealed)

चोपडा (Chopda) शेतकरी सहकारी साखर कारखान्‍याचे चेअरमन किंवा व्यवस्थापकीय संचालक चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. चहार्डी (ता. चोपडा, जि.जळगाव) यांनी उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद (Aurngabad) यांचेकडील रिट याचिका क्र. ५०३९/२०१६ यातील आदेशाच्या अनुषंगाने तात्काळ वसुलीची कार्यवाही करणेबाबत जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश ३ ऑगस्‍ट २०१७, २१ मार्च २०१८ व ३१ जानेवारी २०२२ अन्वये एफ.आर.पी. प्रमाणे ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना (Farmer) द्यावयाची रक्कम अदा न केल्याने, उक्त रक्कम १३ कोटी १३ लाख ८९ हजार रूपये (व्याजासह) देण्यात कसुरी केली. म्हणून चेअरमन किंवा व्यवस्थापकीय संचालक, चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. चहार्डी (ता. चोपडा) यांचे नांवे असलेले मौजे चहार्डी (ता. चोपडा) येथील स्थावर मालमत्ता अटकाव करून ठेवण्यास आणि येणे असलेली रक्कम देण्यात आली नाही. तर ती मालमत्ता या कार्यालयाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत ताब्यात ठेवणेबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच चेअरमन किंवा व्यवस्थापकीय संचालक, चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. चहार्डी यांच्या नावे असलेले बंधन बँक, बुलढाणा अर्बन बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (JDCC Bank) (सर्व चोपडा शाखा) खाते देखील याद्वारे जप्त करण्याचे आदेशित करण्यात येत आहे.

१३१३.८९ लाख एफ आर पी मधून ५ कोटी ५१ लाख रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. बँक खाते सील झाल्याने १० ते १२ लाख रुपये रकमेचे ज्या शेतकऱ्यांना धनादेश दिले आहेत. ते बाऊन्स झाल्यास शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल. याकरीता आज १४ रोजी तहसीलदार अनिल गावीत यांना भेटून खाते सील करू नका अशी विनंती केली आहे. तसेच शेतकरी कृती समितीलाही विनंती करणार आहे. एफआरपी देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. अजून मुदत वाढ मिळण्याची ही विनंती केली.

– अतुल ठाकरे अध्यक्ष, चोसाका

न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांनी ते पैसे कारखानाकडून वसूल करून शेतकऱ्यांना मिळवून देणेबाबतचा अर्ज शेतकरी कृती समितीच्‍यावतीने १९ रोजी दिला होता. त्यानुसार आज चोपडा शेतकरी साखर कारखान्‍याचे बँक खाते सील करण्यात आले. संपूर्ण कारखान्‍यावर शेतकऱ्यांचे पैसे देणेबाबत हक्क ठेवला आहे. जर पुढील काही दिवसात ते वसूल झाली नाही तर पुढील कार्यवाही शासन करेलच.

- एस.बी.पाटील सदस्य शेतकरी कृती समिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT