Banana Farming
Banana Farming Saam tv
ऍग्रो वन

Banana Farming: गिरणा पट्ट्यातील केळीला उत्तर भारतात भाव

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : आजच्या युगात आधुनिक पद्धतीचा वापर करीत शेतकरी कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी सतत धडपड करीत असतो. अशाच धडपडीतून वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील शेतकऱ्याची (Farmer) केळी थेट उत्तर भारतात हरयाणात पोहोचली आहे. (Jalgaon News Banana Farming)

दोन हजार २५० रुपये दर क्विटलप्रमाणे ही केळी (Banana) व्यापाऱ्यांकडून खरेदी केली गेली. केळीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्याचा आत्मविश्वास वाढला आहे. कंदपासून (खोड) रोपे तयार करून केळीचे उत्पादन घेतले आणि त्यात त्यांना भरघोस फायदा झाला. वरखेेडे येथील शेतकरी योगेश बाबुलाल पवार यांनी आपल्या शेतात सुमारे ५ हजार केळी झाडांची लागवड केली आहे. त्यापैकी त्यांनी नुकतीच ७१० केळी झाडांची कापणी करण्यात आली. त्यात त्यांना २२५० रूपये प्रति १८० क्विटल म्हणजे १८ टन माल झाला. ही केळी दर्जेदार असल्याने ती थेट उत्तर भारतात हरयाणा राज्यात पोहोचली आहे.

कंदापासून रोपे निर्मिती

केळीचे पीक तसे अतिसंवेदनशील असते. प्रतिकूल वातावरणाचा या पिकाला फटका बसतो. कधी भाव मिळत नाही. विशेष म्हणजे, शेतकरी योगेश पवार यांनी शेतात तिरीचा बाग घेतला होता. या बागेचा कंद म्हणजे खोडापासून घरच्या घरी रोप तयार करून त्याची लागवड केली. यासाठी त्यांना नाशिक येथील अग्रो कंपनीचे सदाशिव खैरनार यांचे सहकार्य लाभले. एकीकडे शेतकरी केळीचे महागडे रोपे घेतात, पण ती लागवड यशस्वी होईल याची शास्वती नसते. मात्र पवार यांनी चक्क कंदपासूनच रोपे तयार करून केळीचा नवीन प्रयोग साकारला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

SCROLL FOR NEXT