Banana Crop Insurance 
ऍग्रो वन

केळी पिक विमा नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता धूसर; लोकप्रतिनिधींचा नुकसाच दावा

केळी पिक विमा नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता धूसर; लोकप्रतिनिधींचा नुकसाच दावा

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील केळी पीक विमा भरपाईचे पैसे मंजूर झाल्याचा दावा लोकप्रतिनिधी करीत असले आणि त्याबाबतची श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू आहे. परंतु नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी आवश्यक असलेला केंद्र सरकारचा वाटा अद्याप विमा कंपनीला मिळाला नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. केंद्राचा वाटा मिळाल्यानंतर निधी मिळणार असल्याने दिवाळीपूर्वी ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. (jalgaon-news-Banana-crop-insurance-is-unlikely-to-get-compensation-before-Diwali-in-farmer)

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील केळी विम्याच्या नुकसान भरपाई पोटी जिल्ह्यातील १२ हजार ८४७ विमाधारक शेतकऱ्यांना २८ कोटी ३ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ही रक्कम मंजूर करण्यासाठी आपणच पाठपुरावा केला असल्याचा दावा खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. मात्र ही रक्कम दिवाळीपूर्वी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया एका अभ्यासू युवा केळी उत्पादक शेतकऱ्याने व्यक्त केली. याबाबत विमा कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता केंद्र सरकारचा विमा रकमेचा वाटा कंपनीला अद्याप मिळाला नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

रक्‍कम मिळण्यासाठी हवे प्रयत्‍न

केंद्र सरकारचा हा वाटा मिळाल्यानंतर विमा कंपनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम वर्ग करणार आहे. मात्र केंद्र सरकारचा वाटा केव्हा येईल हे निश्चित नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी भरपाईची रक्कम येईल ही शक्यता आता धुसर झाली आहे. लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून केंद्राचा विमा हफ्ता वाटा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.

अशी आहे चित्र

- जिल्ह्यातील विमा योजनेतील सहभागी शेतकरी - ३४ हजार ४३.

- नुकसान भरपाईला पात्र शेतकरी - १२ हजार ८४७.

- मिळणार असलेली नुकसान भरपाई - २८ कोटी ३ लाख रुपये.

- विमा रकमेत शेतकऱ्यांचा हप्ता - ३४ कोटी ०४ लाख रुपये,

- राज्य सरकारचा वाटा - ५९ कोटी ३८ लाख रुपये.

- केंद्र सरकारचा वाटा - ५१ कोटी ६५ लाख रुपये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

Sharad Pawar vs Ajit Pawar : साहेब की दादा, बारामतीमध्ये आज कुणाचा आव्वाज घुमणार?

SCROLL FOR NEXT