बापरे..स्काऊट गाईड दिल्ली कार्यालयातून पाठवलेले प्रमाणपत्र मिळाले तब्बल बारा वर्षांनी

बापरे..दिल्ली कार्यालयातून पाठवलेले प्रमाणपत्र मिळो तब्बल बारा वर्षांनी
स्काऊट गाईड दिल्ली
स्काऊट गाईड दिल्ली
Published On

नंदुरबार : महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला नंदुरबार जिल्हा दुर्गम भाग, अविकसित अशी ओळख आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही सातपुड्याच्या दुर्गम भागात वसलेल्या अनेक आदिवासी पाड्यांवर आजही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाही. जिल्ह्यात योजना उशिरा पोहोचतात हे वास्तव आहे. पण नॅशनल हेडकॉटर स्काऊट गाईड दिल्ली कार्यालयातून पाठवलेले पंतप्रधान यांचा सहीचे प्रमाणपत्र तब्बल बारा वर्षानंतर मिळाल्याचा हा अनुभव प्रकाशा येथील स्काउट विद्यार्थी व शिक्षकांना अनुभवायला मिळाला आहे. (nandurbar-news-got-the scaut-gide-certificate-sent-from-the-Prime-Minister's-Office-after-twelve-years)

स्काऊट गाईड दिल्ली
धक्‍कादायक..नात्‍याला काळीमा, बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

स्काऊट आणि गाईड ही चळवळ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आहे. विद्यार्थ्यांसाठी राज्य पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार परीक्षा असतात मात्र त्यांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना त्याचा उपयोग होत नाही. यासाठी नॅशनल हेडकॉटर दिल्ली व महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड या संस्थेने ही यंत्रणा जलद गतीने करण्याची गरज आहे. जेणेकरून वेळेवर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळतील व शिक्षकांनाही त्याचा मनस्ताप होणार नाही.

नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील सर्वोदय विद्या मंदिर येथे कार्यरत असलेले स्काऊटर शिक्षक नरेंद्र गुरव हे गेल्या २२ वर्षांपासून स्काऊट गाईड चळवळीत आहे. दरवर्षी राज्य पुरस्कार परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रविष्ट करत असतात. तसेच या चळवळीमध्ये असताना नॅशनल जांबोरी कोलकत्ता २००६, दिल्ली २००७ या ठिकाणी विद्यार्थ्यांना नेले आहे. राज्य मेळावा, नॅशनल मेळावासाठी, विद्यार्थ्यांना घेऊन सहभागी झाले होते. स्काऊटच्या राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार २०१५ त्यांना मिळालेला आहे.

स्काऊट गाईड दिल्ली
तहसीलदारांचे खाते हॅक.. ‘पीएम किसान’च्या परस्पर नोंदी

प्रमाणपत्रावर डॉ. मनमोहन सिंग यांची सही

देशाची राजधानी दिल्ली ही नंदुरबार जिल्ह्याहुन एक हजार किलोमीटर लांब असली तरी जिल्ह्यातील प्रकाशा सर्वोदय विद्यामंदिर महाविद्यालयातील स्काऊटचे विद्यार्थी व शिक्षक यांचा ४ ते ८ जानेवारी २०१२ साली दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात सन्मानाचे प्रमाणपत्र प्रकाशा येथे तब्बल बारा वर्षांनी प्राप्त झाले आहे. या प्रमाणपत्रावर तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांची स्वाक्षरी असून ६ जानेवारी २०१२ रोजी दिल्लीहून हे पत्र पाठवल्याची तारीख नमुद आहे.

राज्‍य पुरस्‍कार परीक्षा पासचे अद्याप प्रमाणपत्र नाही

सन २०१६ पासून ज्या शिक्षकांनी पंतप्रधान ढाल स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. त्यांना अद्याप निकाल मिळालेला नाही. २०१८- १९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते व ते पास झालेले आहेत. अद्याप त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नाहीत. सन २०१७-१८ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती पुरस्कार चाचणी परीक्षा पुणे व नागपूर या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्या निकाल आत्ता देण्यात आला. ज्या वेळेला ते विद्यार्थी कालबाह्य होऊन गेले.

मुंबईहून लागले आठ महिने

६ जानेवारी २०१२ रोजी दिल्लीहुन निघालेल्या या पत्राचा प्रवास मुंबई मार्गे झाला असून मुंबईहून नंदुरबार प्रकाशा येथे पोहोचण्यासाठी तब्बल आठ महिन्याचा कालावधी लागल्याचे पाहावयास मिळाले आहे. प्रकाशा, नंदुरबार ते मुंबई ४०० किलोमीटरचा प्रवास आठ महिने लागत असेल व दिल्लीहून बारा वर्षे लागत असेल तर दुर्गम भाग व अविकसित जिल्हा ओळख पुसण्यासाठी शासनाला आणखी किती वर्षे लागतील हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. असेच या प्रमाणपत्राच्या प्रवासावरुन वाटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com