Banana Crop Saam tv
ऍग्रो वन

Banana Crop : भाव नसल्याने केळी बाग उपटून फेकली; सर्व खर्च गेला वाया

Jalgaon News ; १५०० खोड लावून त्यांनी केळी बाग फुलविली. खते आणि न्यूट्रिएन्टवर मोठा खर्च केला. परंतु केळी कापणीस आल्यावर व्यापारी ४०० ते ५०० रुपये दराने केळीची मागणी करीत आहे

संजय महाजन

मुक्ताईनगर (जळगाव) : गेल्यावर्षी केळीला चांगला भाव मिळाला होता. यामुळे यंदा केळीची लागवड वाढली आहे. (Jalgaon) मात्र यंदा केळीला अपेक्षित असा चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आता भाव नसल्याने पिकाला लावलेला खर्च देखील निघणार नाही, अशी परिस्थिती झाली आहे. यामुळे (Muktainagar) मुक्ताईनगरातील एका शेतकऱ्याने शेतातील केळीचे पीक काढून टाकले आहे. 

जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात एका शेतकऱ्याने: केळी कमी भावात मागितली जात असल्याने लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील शेतकरी (Farmer) सतीश चौधरी यांनी मानेगाव शिवारात असलेल्या दीड हजार खोड असलेली केळी बाग (Banana Crop) जेसीबीने उपटून फेकली आहे. यामुळे शेतकऱ्याने आतापर्यंत लावलेला खर्च वाया गेला आहे. 

सतीश चौधरी यांचे मानेगाव शिवारात शेत आहे. १५०० खोड लावून त्यांनी केळी बाग फुलविली. खते आणि न्यूट्रिएन्टवर मोठा खर्च केला. परंतु केळी कापणीस आल्यावर व्यापारी ४०० ते ५०० रुपये दराने केळीची मागणी करीत आहेत. लागवडीपासून उत्पादन निघेपर्यंतच्या खर्चावर कापणीचा व वाहतूक खर्च हा वरचढ ठरल्याने चौधरी यांनी थेट केळी बाग उपटून फेकली आहे. आता खरिपात कपाशी लागवड करण्याची तयारी सुरू केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganga River : देशात ४०० नद्या पण 'या' नदीला राष्ट्रीय महत्त्व का? ९९% लोकांना माहितीच नाही

Maharashtra weather: राज्यात आज कुठे बरसणार पाऊस? ‘या’ ५ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज, हवामान विभागाची माहिती

Tuesday Horoscope : पैशाची चणचण मिटणार, ७ राशींची होणार चांदीच चांदी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

SCROLL FOR NEXT