Electric Shock Saam tv
ऍग्रो वन

Electric Shock : शेतातून येतो म्हणाला पण परतलाच नाही; वायर जोडताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

Jalgaon News : शेतात वायर तुटलेली दिसून आल्याने ती वायर जोडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना विजेचा जबर धक्का बसला. यामुळे ते जमिनीवर फेकले गेले

Rajesh Sonwane

पहूर (जळगाव) : दुपारच्यावेळी शेतात काम असल्याने घरातील सदस्यांना शेतात जाऊन येत असल्याचे सांगून निघाले. यावेळी तुटलेली वायर जोडत असताना विजेच्या धक्क्याने (Electric Shock) तरुण  शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जामनेर (Jamner) तालुक्यातील हिवरखेडा शिवारात घडली. (Tajya Batmya)

हिवरखेड (ता. जामनेर) येथील योगेश अशोक पाटील (वय २४) हे नेहमीप्रमाणे  गावालगत असलेल्या केळीच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतात वायर तुटलेली दिसून आल्याने ती वायर जोडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना (Jalgaon) विजेचा जबर धक्का बसला. यामुळे ते जमिनीवर फेकले गेले. त्यांच्या आवाजाने बाजूलाच क्रिकेट खेळत असणाऱ्या मुलांनी सदर घटनेची माहिती गावातील लोकांना (Farmer) दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत योगेश अशोक पाटील यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नजमुद्दीन तडवी यांनी उपचारांती त्यांना मृत घोषित केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकुलता एक मुलगा गेला 
सध्या अवकाळी पावसाने शेत शिवारातील कामे बंद आहेत. परंतु शेताकडे जाऊन येतो असे म्हणून योगेश आपल्या आई- वडिलांना घरून सांगून निघाला. मात्र शेतातील तुटलेली वायर जोडण्याच्या प्रयत्नात त्याच्या जीवनाचीच तार तुटली. शेतकरी अशोक रामचंद्र पाटील यांचा योगेश हा एकुलता एक मुलगा होता. योगेश शेतातच काबाडकष्ट करून केळीचे उत्पन्न घ्यायचा. त्याच्या मृत्यूमुळे आई वडिलांचा आधार गेला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

Fort Near Lonavala : लोणावळ्याजवळील ऐतिहासिक ठिकाण, हिरवागार निसर्ग फिरून झाल्यावर करा 'या' किल्ल्यावर भटकंती

सहा महिन्यात सरकार कोसळणार; आमदाराच्या दाव्यानं तमिळनाडूतील राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT