Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News : कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकऱ्याने संपविले जीवन

Jalgaon News : शेतीसाठी दीपक चौधरी यांनी खासगी बँक व सोसायटीकडून पाच लाखांचे व खासगी दोन ते अडीच लाख असे एकूण आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

Rajesh Sonwane

जळगाव : निसर्गाचा लहरीपणामुळे उत्पादन चांगले येईल याची शाश्वती बळीराजाला नाही. कर्ज काढून शेती करत असल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने बळीराजा कर्जाच्या बोजाखाली दबला जात आहे. यातूनच टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना जळगाव जिल्ह्यातील झुरखेडा येथे घडली असून कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली आहे. 

जळगावच्या (Jalgaon) धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील शेतकरी दीपक शिवाजी चौधरी (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २८ नोव्हेंबरला दुपारी उघडकीस आली. दीपक चौधरी आई पानूबाई, पत्नी छाया, रोहित व सत्यम अशी दोन मुलं यांच्यासह झुरखेड्यात वास्तव्याला होते. (farmer) आपल्या अल्प शेतीवरच कुटूंबीयांचा उदरनिर्वाह ते करीत होते. 

८ लाखांचे होते कर्ज 

शेतीसाठी दीपक चौधरी यांनी खासगी बँक व सोसायटीकडून पाच लाखांचे व खासगी दोन ते अडीच लाख असे एकूण आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. शेतातून चांगले उत्पादन आल्यानंतर कर्ज फेड करायची या विचारात ते होते. मात्र सततची नापिकीमुळे ते गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

पत्नी शेतातून परतल्यानंतर घटना उघड 

दरम्यान सकाळी त्यांची पत्नी छाया या शेतात कामाला गेल्याने दीपक चौधरी हे घरी एकटेच होते. यावेळी त्यांनी दुपारी एकच्या सुमारास घरात विषारी द्रव पिवून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. दुपारी त्यांची पत्नी शेतातून घरी आल्यावर ही घटना समोर आली. पतीला पाहून पत्नीने आक्रोश केला. आवाज ऐकून ग्रामस्थ धावून आले. यानंतर ग्रामस्थांनी त्यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT