Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Lightning Strike : वीज कोसळून तरुणाचा मृत्यू; केळी लागवड करण्यासाठी गेले असताना घडली घटना

Jalgaon News : खर्डी शिवारात मंगल पाटील यांच्या शेतात केळीचे खोड लावण्याच्या कामासाठी गेला होता

Rajesh Sonwane

अडावद (जळगाव) : जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले होते. या कालावधीत वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत. याच दरम्यान चोपडा तालुक्यातील लोणी येथील शेतकरी केळीचे खोड लावत असताना अचानक वीज पडून तरुणाचा मृत्यू झाला. गरीब कुटुंबातील कर्ता गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत असून शासनाने तत्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.


चोपडा (Chopda) तालुक्यातील लोणी येथील शिवाजी चैत्राम कोळी (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मजुरी करून तो कुटुंबाचा चरितार्थ चालवीत होता. दरम्यान १५ ऑक्टोम्बरला खर्डी शिवारात मंगल पाटील यांच्या शेतात केळीचे खोड लावण्याच्या कामासाठी गेला होता. याच दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली व वीज (Lightning Strike) कोसळली. 

वीज शिवाजी कोळी याच्या डोक्यावरच पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान सोबत असलेल्या मजुरांनी त्याला तत्काळ अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यानंतर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता तेथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. शिवाजी कोळी यांच्या मागे आई, वडील, मुलगा, मुलगी, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. कुटुंबाची सर्व जबाबदारी शिवाजी कोळीवर होती. शासनाने कोळी कुटुंबीयांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena Dasra Melava: इस्त्री-व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही; लोकांसाठी संकटात धावणारा एकनाथ शिंदे|VIDEO

Maharashtra Dasara Melava Live Update: तुम्ही बिस्कीटचा पुडा तरी नेलाय का? एकनाथ शिंंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde : बाळासाहेब असते तर...; दसरा मेळाव्यात शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Shivsena Dasra Melava: मनसे आणि शिवसेना युती होणार का? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले | VIDEO

प्रवास करताना परदेशात तुमचा पासपोर्ट हरवला? तर परत कसा मिळवाल?

SCROLL FOR NEXT