Heavy Rain Jalgaon Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon Rain: परतीच्या पावसाचा कहर; पिकांचे नुकसान

परतीच्या पावसाचा कहर; पिकांचे नुकसान

साम टिव्ही ब्युरो

मेहुणबारे (जळगाव) : परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने चाळीसगाव तालुक्यात मोठा फटका बसला. काही भागांत अल्प, तर काही भागात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. एकाच दिवसात तालुक्यात तब्बल ३९८ मिलिमीटर पाऊस (Rain) झाला. मेहुणबारे, खडकी आणि तळेगाव मंडळात तर अतिवृष्टी झाली. या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे. (Jalgaon News Heavy Rain)

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यात शुक्रवारी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर मध्यम व जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. सात मंडळांपैकी तीन मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात तळेगाव मंडळात पावसाने (Chalisgaon Rain) कहर केला. या मंडळात एकाच दिवसात तब्बल ११० मिमि पाऊस झाला. मेहुणबारे मंडळात ७७ मिमि आणि खडकी मंडळात ६८ मिमि अशी अतिवृष्टी झाली. तर चाळीसगाव मंडळात २२ मिमि, बहाळ मंडळात २४ मिमि, हातले मंडळात ३९ मिमि, शिरसगाव मंडळात ५८ मिमि असा एकूण तालुक्यात ३९८ मिमि इतका पाऊस झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत ८४४.१८ मिमि पाऊस झाला.

पिकांना फटका

परतीच्या पावसाने गुरुवारी रात्री कहर केला. त्यामुळे अनेक भागांतील नदी-नाल्यांना पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. परतीच्या तडाख्यामुळे काही भागात काढून ठेवलेली मक्याची कणसे पाण्यात भिजली. काही दिवसांपासून थांबल्याने व कडक ऊन पडल्याने कपाशी वेचणीची लगबग सुरू होती. मात्र कालच्या परतीच्या पावसाने कपाशीलाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

Uddhav Thackeray :...तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडल्यास मला विचारा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

Maharashtra News Live Updates: मुंबादेवी मतदारसंघात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची छुपी युती?

CJI DY Chandrachud : कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा; निरोप समारभांच्या भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?

IND vs SA 1st T20I: यजमान दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळालं स्थान?

SCROLL FOR NEXT