Vegetable Saam Tv
ऍग्रो वन

हिंगोलीत भाजीपाल्याचे दर कडाडले; भाव 80 ते 90 रुपये किलो!

हिंगोलीच्या भाजी मंडई मध्ये भाजीपाल्याचे दर कडाडले, कांदा बटाटा वगळता सर्वच भाज्या 80 ते 90 रुपये किलो टोमॅटोने गाठली शंभरी

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

संदीप नागरे

हिंगोली: राज्यात पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी करून केंद्र व राज्य सरकारने महागाईने होरपळत असलेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा दिला होता. मात्र आता भाजीपाल्याचे दर (Vegetables Rate) प्रचंड कडाडल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

आज सकाळी हिंगोलीच्या (Hingoli) भाजी मंडईमध्ये बटाटे व कांदे वगळता सर्वच भाज्यांचे दर गगनाला भिडल्याचे पाहायला मिळाले गोबी, चवळी शेंग, दोडका, कारले, या सह विविध पालेभाज्या व फळभाज्या तब्बल 80 ते 90 रुपये प्रति दराने विक्री होत होती, तर टोमॅटोला चक्क 100 रुपये प्रति किलो दर सुरू होता.

भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने पाच भाज्या खरेदी केल्या तर तब्बल पाचशे रुपयांच्या जवळपास पैसे मोजावे लागत असल्याने, नेहमी अर्धा ते एक किलो भाजी खरेदी करणारे ग्राहक, पाव किलो भाजी खरेदी करून वेळ मारून नेत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, सध्या शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी रान खुले करत असल्याने भाजीपाला उपटून फेकत आहेत त्या मुळे भाजीपाल्याची आवक कमी होत असल्याने भाजीपाल्यांचे दर पुढील काही दिवस असेच राहणार असल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

Raw Banana Curry Recipe: फक्त काही मिनिटांत बनवा हिरव्या केळ्याची स्वादिष्ट करी, वाचा स्टेप-बाय-स्टेप रेसिपी

Accident: वारकऱ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्यावर उलटली, ३० प्रवासी गंभीर जखमी

CA Topper 2025: छत्रपती संभाजीनगरच्या लेकाचा देशात डंका! राजन काबरा CA परीक्षेत पहिला

SCROLL FOR NEXT