Soyabean  Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Market : आठवडाभरापासून सोयाबीन खरेदी बंदच; बारदान शिल्लक नसल्याने शेतकरी केंद्रावरच ताटकळत

Hingoli News : भाव वाढ होत नसल्याने काही शेतकऱ्यांनी मात्र नाईलाजाने सोयाबीन विक्री केली होती. दरम्यान सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेडची केंद्र सुरू केली

संदीप नागरे

हिंगोली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे सोयाबीन हमीभावाने खरेदी व्हावे; यासाठी नाफेड केंद्र चालकांमार्फत सोयाबीनची खरेदी सुरू केली होती. मात्र शेतकऱ्यांसाठी उघडण्यात आलेले नाफेड केंद्र मागील आठवडाभरापासून बंद असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मार्केटमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आणले असताना खरेदी होत नसल्याने शेतकरी ताटकळत थांबले आहेत.  

सोयाबीन काढणी झाल्यानंतर योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी बरेच दिवस सोयाबीन घरातच ठेवला होता. भाववाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना थांबावे लागले. भाव वाढ होत नसल्याने काही शेतकऱ्यांनी मात्र नाईलाजाने सोयाबीन विक्री केली होती. दरम्यान सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावानुसार सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेडची केंद्र सुरू केली होती. काही दिवस याठिकाणी देखील सोयाबीन खरेदी झाली. मात्र मागील आठवड्यापासून हि खरेदी देखील थांबली आहे. 

बारदानाअभावी खरेदी बंद 

शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी करण्यासाठी नाफेड केंद्रावर सरकारने बारदाना उपलब्ध करून दिला नसल्याने खरेदी बंद केल्याचे नाफेड खरेदी केंद्र चालकांनी सांगितले. तर विक्रीसाठी काढलेले सोयाबीन किती दिवस सांभाळून ठेवायचे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी सोयाबीन आणला असता अचानक विक्री बंद झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. 

अजूनही सोयाबीन घरात पडून 

भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणी केल्यानंतर घरात साठवून ठेवला होता. मात्र किती दिवस सोयाबीन ठेवायचा या विचारातून काहींनी नाईलाजास्तव सोयाबीनची विक्री केली. असे असले तरी मराठवाड्यात लाखो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याने आर्थिक संकट देखील शेतकऱ्यांचे पुढे उभे राहिले आहे. यामुळे सोयाबीन खरेदी कधी सुरु होणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

Kalyan: अधिकाऱ्यांना मारले, आता ते आम्हाला पण मारतील; फेरिवाल्यांविरोधात कारवाई करा, शिंदेंचे नगरसेवक आक्रमक

SCROLL FOR NEXT