Bogus Crop Insurance Saam tv
ऍग्रो वन

Bogus Crop Insurance : शासकीय जमिनींवर उतरवला पीक विमा; हिंगोली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार, अन्य जिल्ह्यातील सेवा केंद्रांचा वापर

Hingoli News : शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी पिकांना सुरक्षा कवच म्हणून पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे

संदीप नागरे

हिंगोली : संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने ढवळून निघालेला बीड जिल्हा पुन्हा एकदा राज्यभरात चर्चेत आला आहे. याला कारण ठरलय हिंगोलीत बोगस पिक विम्याचे उघडकीस आलेले प्रकरण. बीड जिल्ह्यातील सीएससी केंद्र चालकांनी थेट हिंगोली जिल्ह्यातील शासकीय जमिनीवर पिक विमा भरल्याचे उघड झाले आहे. या बोगस पीक विमा प्रकरणामुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.  

शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी पिकांना सुरक्षा कवच म्हणून पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. अर्थात शेतकऱ्यांना एक रुपया भरून विमा योजनेचा लाभ घेता येत असतो. मात्र यामध्ये देखील शेती नसताना पीक विमा उतरविल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यात चक्क शासकीय जागांवर पीक विमा उतरविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

१८१४ बोगस शेतकऱ्यांचा विमा 

हिंगोली जिल्ह्यात महसूल गायरान आणि विविध संस्थानांच्या जमिनीवर १ हजार ८१४ बोगस शेतकऱ्यांचा पिक विमा उतरवण्यात आला आहे. या प्रकरणाने खळबळ उडाल्यानंतर हिंगोलीच्या कृषी विभागाने पीक विमा कंपनीला लेखी पत्र लिहीत तातडीने या शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ देऊ नये; अशा सूचना केल्या आहेत. अर्थात हे प्रकरण लवकर उजेडात आल्याने विम्याची रक्कम देण्यापूर्वीच थांबविण्यात आली आहे.  

फसवणूक करणाऱ्यांचा शोध 

धक्कादायक म्हणजे अशा प्रकारे बोगस पीक विमा भरण्यासाठी बीड जिल्ह्यातील सेवा केंद्रांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे बीड जिल्ह्यातूनच याचे कनेक्शन असण्याची शक्यता आहे. दरम्यान बेचिराख झालेल्या गावांच्या जमिनीवर देखील पीकविमा काढण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या नावाने पिक विमा कंपनीला लुटणारे महाठग कोण आहेत? याचा शोध आता सुरू झाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT