Mango - Saam Tv
ऍग्रो वन

वादळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका!

राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंगोली: राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. या पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या (farmers) शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील नांदापूर येथील शेतकरी भूषण देशमुख यांच्या अडीच एकर शेत जमिनीवर लावलेल्या आंब्याच्या बागेचे रात्री झालेल्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हे देखील पहा-

वादळी वारे आणि पावसामुळे (Rain) आंबे जमिनीवर पडले आहेत. दरम्यान, यावर्षी आंब्याचा बहर थोडा उशीर आणि कमी लागला आहे. त्यामध्ये रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणावर झाडाची फळे तुटून जमिनीवर पडली आहेत. तुटलेल्या फळांना आता कवडीमोलाचे देखील किंमत राहिली नाही. यामुळे हा आंबा कोणी खरेदी करत नाही. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आंब्याचा झाडाची ६० ते ७० टक्के फळे तुटून पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात आहेत. यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावे आणि मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. १३ वर्ष जूनी केशर आंब्याची बाग आहे. २ वर्ष कोरोनाचे बाग कमी प्रमाणात फुटली होती. यामध्ये दर देखील कमी मिळाला होता. आता यावर्षी आंबे कमी प्रमाणात आले पण दर चांगला मिळेल अशी अपेक्षा होती.

परंतू, काल झालेल्या आस्मानी संकटाने ७० ते ८० टक्के आंबा बागांचे नुकसान झाल्याचे शेतकरी भूषण देशमुख यांनी सांगितले आहे. पूर्ण वर्षभराचे नियोजन या २ महिन्यावर अवलंबून असते. पण अवकाळी पावसाने शेतीचे नियोजन कोलमडल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्याने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.

राज्यातील सांगली, सोलापूर (Solapur), मराठवाड्याचा काही भाग तसेच विदर्भात देखील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात देखील अवकाळी पावसाने आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सांगलीमध्ये पावसाबरोबरच जोरदार वारा सुटल्याने रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: हा विजय अजितदादांना समर्पित, अजितदादांच्या धेय्यधोरणांवर काम करणार - अनिकेत तटकरे

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT