Gondia News Saam tv
ऍग्रो वन

Gondia News : कृषी विभागाची कारवाई...कृषी केंद्राकडून नियमांचे उल्लंघन; जिल्ह्यातील १० केंद्रांचे परवाने रद्द

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: हंगाम सुरु झाल्यानंतर खते, कीटकनाशक, बी- बियाणे यांची मागणी वाढत असते. अशात काही विक्रेत्यांकडून काळाबाजार करत बोगस बियाणे, खतांची विक्री केली जात असते. या अनुषंगाने कृषी विभागाने काही नियम आखून दिले असताना त्यात अनियमितता आढळून आल्याने गोंदिया जिल्ह्यातील दहा कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई कृषी विभागाने केली आहे.  

गोंदिया (Gondia) जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी- बियाणे, खते व कीटकनाशकांचा विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथक स्थापन केली आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश आहे. या गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणीसाठी धडक मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. याच (Agriculture Department) मोहिमेदरम्यान नियमाचे उल्लघंन करणाऱ्या १० कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

या नियमांचे केले नाही पालन 
कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, कृषी सेवा केंद्र शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषी निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे आदी कारणांमुळे १० निविष्ठाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख, जाणून घ्या;सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

SCROLL FOR NEXT