Manjara Sugar Factory Scam दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

लातूर: ऊस एकाचा अन् बिल दुसऱ्याला! मांजरा परिवारातील कारभाराचा नवा पॅटर्न उघडकीस

संगनमत करून शेतकऱ्यांच्‍या ४९ टन ऊसाची चोरी

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर: ऊस तोडणीसाठी आलेल्‍या मांजरा कारखान्‍याच्‍या सर्व संबंधितांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्‍या ४९ टन ऊसाची चोरी केली असून मांजरा परिवारातील कारभाराचा नवा पॅटर्न यातून उघडकीस आला आहे. चोरीच्‍या या प्रकरणी चेअरमन, कार्यकारी संचालक यांच्‍यासह सर्व संबंधीताविरूध्‍द गुन्‍हे दाखल करावेत अशी मागणी कारखान्‍याचे शेतकरी सभासद भाजपाचे नेते राजेश कराड यांनी केली आहे.

गेल्‍या १८-२० महिन्‍यापासून शेतात ऊस उभा असल्‍याने शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात अडवणूक, पिळवणूक आणि छळवणूक होत असताना मांजरा परिवारातील साखर सम्राट मात्र लावणीच्‍या फडात दंग असल्‍याने शेतकरी मोठा असंतोष व्‍यक्‍त करत आहेत.

मांजरा साखर कारखान्‍याचे रामेश्‍वर येथील शेतकरी सभासद हनुमंत तुळशीराम कराड यांचा ऊस कारखान्‍याच्‍या तोडणी कार्यक्रमानुसार ऊस तोडणी यंत्राद्वारे तोडण्‍यात आला. सदरील ऊसाच्‍या वजनाची माहिती घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र अधिकृत मिळाली नाही. आठ दिवसांनी ऊसाची रक्‍कम खात्‍यावर जमा झाल्‍यानंतर संशय आल्‍याने चौकशी केली असता वाहतूक ठेकेदार कालिदास शिंदे यांनी आपल्‍या वडीलांच्‍या नावे ४९ टन कारखान्‍याला ऊस दिला.

ऊसाच्‍या ट्रीपची चोरी झाल्‍याचे निष्‍पन्‍न झाल्‍याने मौजे रामेश्‍वर येथे राजेश कराड यांच्‍यासह असंख्‍य शेतकऱ्यांनी मांजरा कारखान्‍याचे काटगाव गटातील गटप्रमुख घोडके, कर्मचारी शेख नजीर, लोमटे आणि वाहतूक ठेकेदार कालिदास शिंदे यांना विचारणा करण्‍यासाठी बोलावून घेतले असता त्‍यांच्‍या चौकशीतून चोरीचा प्रकार उघडकीस आला. रामेश्‍वर येथील पोलीस पाटील शरद पाटील यांच्‍या मार्फत संबंधीत कर्मचाऱ्यांना पो‍लीस उपनिरिक्षक अशोक घाटगे व त्‍यांच्‍या सहकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

सदर प्रकरणी शेतकऱ्याच्‍या ऊसाची संगनमताने चोरी करणाऱ्या सर्व संबंधीत अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांच्‍या विरूध्‍द गातेगाव पोलीस ठाण्‍यात शेतकरी हनुमंत तुळशीराम कराड यांनी तक्रारी अर्ज देऊन गुन्‍हे दाखल करण्‍याची मागणी केली आहे. तर मांजरा साखर कारखान्याचे कर्मचारी यांनी विश्वासाने वाहतूक ठेकेदाराच्या जवळ ऊसतोड स्लीपाचे पुस्तक ठेवले त्यांनी विश्वासघात करत स्वतः च्या नावे ऊस कारखान्याला दिला त्यावर आमचे हस्ताक्षर नाही असा खुलासा केला आहे. राज्यात नव्हे तर देशात स्वतः ची ओळख निर्माण करणाऱ्या मांजरा सहकारी साखर कारखान्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीची घटना घडली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

23 हजार IT कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, मेटा, मायक्रोसॉफ्टकडून नोकरकपात?

Saturday Horoscope: शनिदेव या ४ राशींवर कोपणार, काहींची होणार भरभराट; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

SCROLL FOR NEXT