अवकाळी पावसाच्या भीतीने मावळात भात कापणीला सुरवात! 
ऍग्रो वन

अवकाळी पावसाच्या भीतीने मावळात भात कापणीला सुरवात!

अनेक शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाच्या तावडीत सापडू नये, याची काळजी घेत तयार झालेले भात पीक काढायला सुरुवात केली आहे.

दिलीप कांबळे

मावळ : अवकाळी पावसाच्या भीतीने मावळातील शेतकऱ्यांचा भात कापणीला आला वेग आला असून मजुरांचा तुटवडा त्यामुळे यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. तर मावळ मधील उर्से या भागात पारंपरिक पद्धतीने भात झोडपणी सुरू झाली आहे. मावळ मध्ये इंद्रायणी भात कापणीचे काम जोमात सुरु आहे.

हे देखील पहा :

अनेकांनी अवकाळी पावसाच्या तावडीत सापडू नये, याची काळजी घेत तयार झालेले भात पीक काढायला सुरुवात केली आहे. त्या शेतकऱ्यांच्या कामाचा वेग वाढवला आहे. सध्या शेतकऱ्यांना मजुरांची गरज असतानाच त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्वच शेतकऱ्यांची कामे एकाच वेळी सुरू झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांनी यंत्रांचा आधार घेतला तर भात झोडपणी ही जोरात सुरू आहे.

काल रात्री पावसाचा व्यत्यय आला होता. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी वेळीच भाताची पिकांची कापणी करून इंद्रायणी तांदूळ शेतातून घरी नेला आहे, त्यांची पिके सुरक्षित आहे. तर मजुरांअभावी अजूनही काही शेतकऱ्यांची पिके शेतात असल्याने शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला इंद्रायणी भाताचा घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे. त्यामुळे सणासुदीला याच तांदुळाची बाजारपेठेत विक्री करून आपला परिवाराचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity : पावसाळ्यात चहाचा अतिरेक टाळा, फक्त ॲसिडीटी नाही तर होतील 'हे' गंभीर आजार

Asia Cup 2027: एशिया कप 2027 च्या तारखा समोर, यंदा टी-20 नव्हे तर वेगळ्याच फॉरमॅटमध्ये होणार थरार!

Indian Railways: TTE आणि TC यांच्यातील फरक तुम्हाला माहितीये का?

Maharashtra News Live Update: सलग पाच दिवसांच्या अतिवृष्टीचा नालासोपाऱ्यात तिसरा बळी; पाण्यात पोहताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमधील शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT