राज्य सरकारने दलाली खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही - आ. लोणीकर रामनाथ दवणे
ऍग्रो वन

राज्य सरकारने दलाली खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही - आ. लोणीकर

राज्य सरकारने दलाली खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असा गंभीर आरोप करत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

रामनाथ दवणे

नांदेड: जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे शेतकरी संवाद दरम्यान माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास तयार नाहीत राज्य सरकारने यामध्ये दलाली खाल्ली आहे असा घणाघाती आरोप केला होता. ऑनलाईनचा फार्स निर्माण करून शेतकऱ्यांना पीक विमा द्यायचा नाही अशी कंपनीची मानसिकता असल्याचे देखील त्यावेळी लोणीकर यांनी सांगितले होते. (Farmers will not get crop insurance as the state government has taken bribes said MLA Babanrao Lonikar)

हे देखील पहा -

शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाइन होत नसतील तर ऑफलाइन पद्धतीने अर्ज जमा करा संबंधित अधिकाऱ्यांकडे तहसील कार्यालयात येऊन जमा करा व प्रत्येक अर्जाची पोच पावती घ्या, अन्यथा पीक विमा कंपन्या तुमचे अर्ज गोदावरीच्या बंधाऱ्यात फेकून देतील आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असे म्हटले होते. ते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांचे हे भाकीत तंतोतंत खरे ठरले असून आंतरगाव ता. नायगाव जि. नांदेड येथील शेतकऱ्यांचे पिक विमा कंपनीकडे भरण्यात आलेले ऑफलाईन अर्ज कंपनीने चक्क उसाच्या शेतात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राज्य सरकारने पिक विमा कंपनीशी केलेल्या करारामुळे पिक विमा कंपन्या मालक आणि दलाली खाणारे राज्य सरकार गुलाम झाले आहे. राज्य सरकारने केलेल्या कराराप्रमाणे पिक विमा कंपन्या प्रशासनाने केलेले पंचनामे मान्य करण्यास तयार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही. पिक विमा कंपनीकडे पंचनामे करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. एका जिल्ह्यात केवळ त्यांचे पाच ते सहा प्रतिनिधी आहेत, परिणामी सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे कंपनी करूच शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा देता येऊ नये यासाठी कंपनीला हवी असणारी सोय राज्य सरकारने करून ठेवले असल्याचा घणाघाती आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT