nashik news, onion price, rasta roko andolan
nashik news, onion price, rasta roko andolan saam tv
ऍग्रो वन

Mumbai Agra Highway Rasta Roko Andolan News : कांदा उत्पादक शेतक-यांनी राेखला मुंबई- आग्रा महामार्ग

Siddharth Latkar

- अजय साेनवणे

Nashik News : कांद्याचा दर (onion Price) दिवसेंदिवस घसरु लागला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी (farmer) संतापले आहेत. जिल्ह्यात गेल्या दाेन तीन दिवसांपासून बहुतांश ठिकाणी शेतकरी रास्ताे राेकाे (Rasta Roko Andolan For Onion Price) करु लागले आहेत. आज (शनिवार) शेतक-यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन केले. (Maharashtra News)

नाशिकच्या चांदवड येथे आज कांदा लिलाव सुरु झाला. त्यानंतर पुरेसे व्यापारी नसल्याने आणि त्यातच काही शेतक-यांना शंभर ते दिडशे रुपये दर मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. कांद्याला याेग्य दर मिळावा यासाठी सरकारचे लक्ष वेधले जावे म्हणून शेतक-यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदाेलन केले.

हे आंदाेलन सुरु असल्याची माहिती माजी आमदार शिरिष कोतवाल यांनी समजली. त्यानंतर काेतवाल स्वत: घटनास्थळी पोहचले. त्यांनी शेतकरी आंदोलकांची भूमिका आणि प्रश्न समजावून घेतली. त्यानंतर आंदाेलकांनी समजूत काढली. काेतवाल यांच्या आश्वासनानंतर शेतक-यांनी रास्ता रोको आंदाेलन मागे घेतले.

दरम्यान काही दिवसांपुर्वी विंचूर प्रकाशा राज्य मार्गावरील रस्त्यावर उतरत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले हाेते. त्यानंतर जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील केळझर फाट्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन छेडले हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

Pune News : रात्री 12 वाजता बॅंक सुरु! निवडणूक आयोगाची बॅंकेवर मोठी कारवाई

Special Report : Election Scam | माढ्यात नकली नोटांचा पाऊस! उत्तम जानकरांचा आरोप काय?

IPL 2024 DC vs RR: घरच्या मैदानात दिल्लीची फटकेबाजी; राजस्थानसमोर २२२ धावांचे आव्हान

Special Report : किरण सामंत नॉट रिचेबल! राणेंचं टेंशन वाढवणार?

SCROLL FOR NEXT