farmers morcha at sant tukaram sahakari sakhar karkhana  saam tv
ऍग्रो वन

Maval News : कहीं खुशी कहीं गम, श्री संत तुकाराम साखर कारखान्यावर पाेलीसांचा तगडा बंदाेबस्त

शेतकऱ्यांना प्रत्येक टनाला साखर कारखान्याने 3300 रुपये प्रति टन भाव द्यावा अशी मागणी जाेर धरु लागली आहे.

दिलीप कांबळे

Maval News : मावळ तालुक्यात श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा (shri sant tukaram sahakari sakhar karkhana) 26 वा गळीत हंगाम आज (शुक्रवार) माेठ्या उत्साहात पार पडला. दूसरीकडे कारखान्याच्या संचालकांचा कारभारा विराेधात शेतक-यांनी विराट माेर्चा काढला. यामुळे कहीं खुशी कहीं गम अशी परिस्थिती आज कारखान्यावर हाेती.(Maharashtra News)

मावळ मधील कासारसाई येथे असलेल्या श्री संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचा 26 व्या गळीत हंगामास खासदार श्रीरंग बारणे (mp shrirang barne), माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, देहू संस्थांनचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी आमदार शरद ढमाले व साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले तसेच कारखान्याचे संचालक उपस्थित हाेते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी साखर कारखान्यामध्ये बॉयलरच्या पूजनानंतर ऊस टाकून गळीत हंगामाचा मान्यवरांनी शुभारंभ केला. आजपासून शेतकऱ्यांचा ऊस घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता ऊस शेतकऱ्यांमध्ये लगबग दिसून येत आहे. तर साखर कारखान्याबाहेर देखील ऊसतोड़ कामगारांची लगबग दिसून आली.

संत तुकाराम साखर कारखान्यावर शेतकऱ्यांचा मोर्चा

उसाला प्रतिटन चार हजार रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी आज संत तुकाराम साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. या साखर कारखान्यात पाच तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस येत असतो. मात्र या कारखान्यात संचालक मंडळाचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप माऊली दाभाडे यांच्याससह शेतकऱ्यांनी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी कारखान्यावरील शेतकऱ्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अंबाबाईच्या दर्शनाला

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT