...म्हणून या गावांतील शेतकरी 'ही' पिके पंधरा वर्षांपासून घेत नाहीत !
...म्हणून या गावांतील शेतकरी 'ही' पिके पंधरा वर्षांपासून घेत नाहीत ! जयेश गावंडे
ऍग्रो वन

...म्हणून या गावांतील शेतकरी 'ही' पिके पंधरा वर्षांपासून घेत नाहीत !

जयेश गावंडे

जयेश गावंडे

अकोला: जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील पंधरा ते वीस गावांतील शेतकरी वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे ज्वारी, मका यासारखी उभी पिके घेत नाहीत. गेल्या दीड दशकापासून येथील शेतकरी हे ज्वारी, मका, उडीद, मूग या सारखी पिके पेरत नाहीत. कारण या भागात हरीण, माकड, रानडुक्कर मोठ्या प्रमाणात असून उभ्या पिकांचे हे प्राणी नुकसान करतात. जी पिके घेतली जातात त्याही पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करतात. Farmers do not sow crops like sorghum, maize, urad, green gram

अकोला तालुक्यातील पंधरा ते वीस गावांमध्ये शेतकऱ्यांनी ज्वारी, मका व मूग उडिदाचा पेरा घेणे बंदच केले आहे. अकोल्यातील रामगाव या गावातील शेतशिवारात साम टीव्हीच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता शेतात काम करत असलेले रामगाव येथील शेतकरी शिवाजीराव भरणे यांनी वन्यप्राण्यांच्या हैदोसचा पाढा वाचला.

गेल्या 15 वर्षांपासून या पिकांची पेरणी बंद करण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले. तर आजूबाजूच्या पंधरा ते वीस गावांमध्ये सुद्धा या पिकांचे उत्पादन नामशेष झाले आहे. इतरही शेतकऱ्यांनी वन्यप्राण्याच्या होत असलेल्या त्रासाबद्दल माहिती दिली. पिके सोडून सोयाबीन, तूर आणि कपाशीचे पीक वन्य प्राण्यांच्या हैदोसातून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते.

रात्रंदिवस या पिकांची येथील शेतकऱ्यांना राखंदारी करावी लागते. अकोला तालुक्यात म्हैसांग, रामगाव, गोंदापूर, मुजरे मोहंमदपूर, पळसो बढे, दहिगाव गावंडे, बहिरखेड, कौलखेड जहाॅगीर, मजलापूर, दापूरा, अंबिकापूर व कट्यार, अनवी, मिर्झापुर, खडका, आदी पंधरा ते वीस गावांमध्ये ज्वारी, संकरीत ज्वारी, मूग व उडिद या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात येत होती. महत्वाचे पीक म्हणून या पिकांचे उत्पादन घेतले जात होते.

परंतू 2006 पासून या गावांतील शेतांमध्ये हरिण, जंगली डुकर व रोही इत्यादी वन्य प्राण्यांचा हैदोस सुरु झाला. शेतात पेरलेले ज्वारी, मूग व उडिदाचे पीक वन्य प्राण्यांच्या हैदोसात उध्वस्त होत असल्याने गावांतील शेतकऱ्यांनी या पिकांचा पेरा सोडून दिला. वन्य प्राण्यांच्या धुमाकुळात पेरलेले पीक काहीच हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकांची पेरणी बंद केली.

त्यामुळे या गावांतील ज्वारी, मका आणि मूग, उडिदाचे उत्पादन नामशेष झाले आहे. सद्यस्थितीत या गावांमध्ये सोयाबीन, तूर व कपाशी या पिकांचे उत्पादन घेण्यात येत असले तरी, वन्य प्राण्यांच्या हैदोसातून ही पिके वाचविण्यासाठीही शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात टाकून धडपड करावी लागत आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB Playoffs Scenario: 'इ साला कप नामदे..' RCB ला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! करावं लागेल हे काम

Yogita Chavan: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

Today's Marathi News Live : साखर कारखान्याचा १०००० कोटींचा आयकर माफ केला, देवेंद्र फडणवीस

Mumbra News : मुंब्रा परिसरात एनसीबीची मोठी कारवाई; आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीला पर्दाफाश

Mumbai Jobs | मराठी माणसाविषयीची ती पोस्ट, कंपनीने मागितली माफी!

SCROLL FOR NEXT