संतप्त शेतकऱ्यांनी मिरची मार्केट बंद पाडला लक्ष्मण सोळुंके
ऍग्रो वन

संतप्त शेतकऱ्यांनी मिरची मार्केट बंद पाडला

जालना येथील जाफ्राबाद याठिकाणी मिरची मार्केटमध्ये मिरची उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : आज जालना Jalna येथील जाफ्राबाद Jafrabad याठिकाणी मिरची Chili मार्केटमध्ये Market मिरची उत्पादक शेतकरी Farmers चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहे. मागील २ दिवसांपूर्वी जाफराबाद मार्केट मध्ये व्यापाऱ्यांकडून merchants ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने मिरची खरेदी केली गेली आहे.

हे देखील पहा-

मार्केट मध्ये चांगला भाव मिळायला लागल्याने यामुळे आज मिरची मार्केट मध्ये परिसरासह इतर तालुक्यामधील शेतकऱ्यांनी ही मोठ्या प्रमाणावर मिरची आणल्यामुळे मार्केटमध्ये मिरचीची आवक वाढल्याने. व्यापाऱ्यांनी आवक वाढताच मिरचीची कमी दराने खरेदी करायला सुरवात केली. संतप्त झालेल्या, शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली मिरची फेकून देऊन, व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या गळचेपिचा जाहीर निषेध नोंदवत मिरची मार्केट बंद पाडले आहे.

व्यापाऱ्यांनी पोलिसांना बोलावून, शेतकऱ्यांवर दाबाव निर्माण करण्याचा प्रयन्त ही केला होता. मात्र, शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याकडून पोत्याच्या वजन, कडताच्या नावाखाली प्रत्येक काट्या मागे ३ किलो मिरची काढून घेऊन ६३ किलोचा कट्टा ५९ किलोचा लावून त्यात ही दर कमी लावत असल्याचे पोलिसाच्या Police निरदर्शनास आणून दिल्याने, अखेर पोलिसांनी या वादात हस्तक्षेप करत शेतकरी आणि व्यापारी यांचा वाद मिटवला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

SCROLL FOR NEXT