पावसाने ओढ दिली? घाबरू नका असे वाचवा पिक; कृषी तज्ञांचा सल्ला Saam Tv
ऍग्रो वन

पावसाने ओढ दिली? घाबरू नका असे वाचवा पिक; कृषी तज्ञांचा सल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad District) मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी (Farmer) वर्ग चिंतेत पडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

कैलास चौधरी

उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad District) मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी (Farmer) वर्ग चिंतेत पडला आहे. मात्र आता शेतकऱ्यांनी घाबरून न जाता या पिकांची फवारणी करून पीक वाचवू शकतो अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात खरिपातील सर्वाधिक पेरणी ही सोयाबीनची आहे. या बरोबरच इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे, मात्र गेल्या वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके कोमेजून जात आहेत. सध्या पिकांना फुले आणि शेंगा भरण्याची स्थिती असून आता पावसाची नितांत गरज आहे. मात्र शेतकऱ्यांनी काळजी घेतल्यास ही पीके अजूनही दहा ते पंधरा दिवस तग धरू शकतात त्याबाबत कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन करण्यात येते आहे.

राज्यात सुरुवातीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. परतू आता संपुर्ण महाराष्ट्रातच पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे बळीराजा पुरता संकटात सापडला आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस सुरु झाला आहे. परंतू त्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे. आता अशा कृषी तज्ञांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना महत्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

SCROLL FOR NEXT