<div class="paragraphs"><p>कुणी बियाणे देता बियाणे..सोयाबिनचे बियाणे ?</p></div>

कुणी बियाणे देता बियाणे..सोयाबिनचे बियाणे ?

 

जयेश गावंडे

ऍग्रो वन

कुणी बियाणे देता बियाणे..सोयाबिनचे बियाणे ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जयेश गावंडे

अकोला - मान्सून Monsoon सुरू होताच पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. शेतकरी आता बियाणे Seeds खरेदीसाठी बाजारात आला आहे. शेतकऱ्यांना सोयाबीन Soybean बियाणे सुरवातीला मिळाले. परंतु, आता शेतकऱ्यांना हे बियाणे मिळत नसल्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच कृषी सेवा केंद्रावर सोयाबीन बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला. मात्र, कृषी विभाग याबाबत काहीही बोलण्यास तयार नसल्याने शेतकरी हा धुऱ्यावर बसून दुसरे पीक घेण्याच्या तयारीत आहे. Farmers are asking for soybean seed in Akola

यावर्षी पाऊस वेळेवर आला. परंतु, तो सर्वदूर पडला नाही. अनेक भागात कपाशीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर दुसरीकडे जे शेतकरी सोयाबीन पेरतात ते बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा Agricultural Services केंद्रावर आले आहेत. परंतु, कुठल्याच केंद्रावर शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकरी बियाणे मिळत नसल्याने हतबल झाला आहे.

हे देखील पहा-

जे कृषी सेवा केंद्रचालक सोयाबीन बियाणे ओळखीतून विकत आहेत, ते उच्च दराने बियाणे विकत आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन बियाणे हे महाबीज व्यतिरिक्त दुसऱ्या कंपनीचे देण्यात येत आहे. बाजारात सोयाबीन बियाणे नसल्याने त्याचा कृत्रिम साठेबाजी केल्या जात असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

कृषी सेवा केंद्राचे संचालक शिव मालोकर यांनी माहिती दिली की, आधीच शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केलेले आहे. परंतु, आता शेतकऱ्यांना बियाणे मिळत नाही, ही परिस्थिती नाही. कंपनीच जादा दराने विक्रेत्यांना बियाणे विकत असल्याने अनेक कृषी सेवा केंद्र संचालकांनी बियाणे खरेदी केले नाही.

सोयाबीनचे दर यावेळी ७ हजार ८०० रुपयांपेक्षा जास्त क्विंटलने विकली गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी किंवा बीजवाईचे सोयाबीन ही शेतकऱ्यांनी विकले आहे. परिणामी, शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नाही. विविध कंपनी आणि महाबीजचे सोयाबीन बियाणेही विकल्या गेले आहेत. जो माल शिल्लक आहे, तोही विकला जात असल्याने बाजारात सोयाबीन बियाण्यांभास तुटवडा होऊ शकत नाही, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

यावर्षी महाबीजने १३ हजार ७११ क्विंटलसोयाबीन बियाणे दिले. तर खासगी कंपनीकडून ६५ हजार ४७२ क्विंटल बियाणे बाजारात पुरवठा होतो. असा एकूण ७९ हजार १८३ क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध होतात. आतापर्यंत ७७ हजार ६२१ क्विंटल विकले गेले आहे. यावर्षी कृषी विभागाने ६१ हजार सोयाबीन बियाण्यांची मागणी केली होती. दरवर्षी एक लाख ६० हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यात आवश्यक असतात.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का; दिल्लीच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Patra Chawl Scam: संजय राऊतांकडून माझा आणि कुटुंबीयांचा छळ', स्वप्ना पाटकर यांचा गंभीर आरोप

Jalna News | जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक! भाजप कार्यकर्ते आंदोलकांमध्ये झटापट...

Urvashi Rautela: ऋषभ पंतशी लग्न करणार का? चाहत्याचा प्रश्न, दोन शब्दात उत्तर देत उर्वशी रौतेलानं चर्चा केली शांत

Bachchu Kadu Sangali Speech |"जात-धर्माशिवाय तुम्हाला निवडणुका जिंकता येत नाही", बच्चू कडू बरसले!

SCROLL FOR NEXT