Shreya Maskar
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिच्या एका स्माइलचे लाखो चाहते दिवाने आहेत.
प्राजक्ता माळी अभिनयासोबत एक उत्तम व्यावसायिक, कवियत्री, सूत्रसंचालक आणि निर्माती आहे.
नुकतेच प्राजक्ताने सुंदर गोल्डन साडीतील फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताच्या रॉयल लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिचा हा अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला आहे.
प्राजक्ताने फ्लोरल प्रिंट गोल्डन रंगाची साडी नेसली आहे. त्यावर हिरव्या रंगाची फुलांची नक्षी पाहायला मिळत आहे.
मोत्यांचे दागिने, मोकळे केस आणि मिनिमल मेकअपमध्ये प्राजक्ताचे सौंदर्य खुलून आले आहे.
कपाळावर काळी बिंदी आणि डोळ्यात जादू, प्राजक्ताच्या या लूकने तिने चाहत्यांना वेड लावले आहे.
महाराष्ट्रात प्राजक्ता माळीला 'फुलवंती' या नावाने ओळखले जातात.