बीडमध्ये अनेक मागण्यांसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर Saam Tv
ऍग्रो वन

बीडमध्ये अनेक मागण्यांसाठी हजारो शेतकरी रस्त्यावर

बीडमध्ये किसान संघर्ष समितीच्या (Kisan sangharsh samiti) वतीने तर अंबाजोगाईत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने, भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे.

विनोद जिरे

बीड: गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालं होतं. त्यामुळे भरलेल्या पीक विम्याची मागणी घेऊन, बीड जिल्ह्यात (Beed District) हजारो शेतकरी आज रस्त्यावर उतरले आहेत. बीडमध्ये किसान संघर्ष समितीच्या (Kisan sangharsh samiti) वतीने तर अंबाजोगाईत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने, भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे.

यावेळी मागील वर्षाचा पिक विमा तात्काळ वाटप करण्यात यावा. नव्याने पारित केलेले कृषी कायदे तात्काळ रद्द करा. पीक कर्जासाठी बँकेकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक तात्काळ थांबवा. इंधन दरवाढ कमी करा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चालू हंगामातील गाळपाची रक्कम एकरकमी द्यावी. गेल्या काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झालेल्या भागातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या.

संजय गांधी निराधार योजनेचे मानधन प्रत्येक महिन्याला वाटप करा. 65 वर्षाच्या पुढील शेतकऱ्यांना प्रति महिना 10 हजार रुपये पेन्शन लागू करा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून, थकीत नसलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन 50 हजार रुपये अनुदान द्या. या प्रमुख मागण्यांसाठी बीड जिल्ह्यात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हजारो शेतकरी आज रस्त्यावर उतरले होते. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास, यापेक्षा तीव्र आंदोलन करू. असा इशारा शेकापचे नेते भाई मोहन गुंड आणि शेतकरी संघर्ष समितीचे नेते भाई गंगाभीषण थावरे यांनी दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

SCROLL FOR NEXT