मावळातील शेटेवाडीमधील शेतकरी आक्रमक दिलीप कांबळे
ऍग्रो वन

Maval: पुनर्वसनाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक; एमआयडीसीचा पाणीपुरवठा केला शेतकऱ्यांनी बंद...

दिलीप कांबळे

पुणे: मावळमधील आंध्र धरण प्रकल्पाला 1998 मध्ये मंजुरी मिळाली. परिणामी 13 गावातील शेतकऱ्यांची 600 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली व त्यामध्ये शिरे, शेटेवाडी (shire shetewadi) या गावातील शेतकऱ्यांच्याही शेतजमीनी पाण्याखाली गेल्या. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन न राहिल्याने शेतकरी गावठाण पुनर्वसन (Rehabilitation) व्हावे म्हणून मागणी करत आहे. परंतु राज्य सरकार सतत दुर्लक्ष करत असल्याने शेटेवाडी मधील शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी थेट एमआयडीसीमधील (MIDC) कंपन्यांना होणारा पाणीपुरवठा (Water Supply) बंद केला. (Farmers aggressive in demanding rehabilitation; MIDC's water supply cut by farmers)

हे देखील पहा -

शेतकऱ्यांच्या (Farmers) जमिनी घेऊन त्या जागेवर कंपन्या उभ्या केल्या परंतु शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जात नाही आणि जमिनीचा मोबदला देखील शेतकऱ्यांना दिला जात नसल्याने मावळमधील (Maval) हे शेतकरी आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तळेगाव एमआयडीसीमधील कंपन्यांना हा पाणीपुरवठा सुरू करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

SCROLL FOR NEXT