Alisha Khedekar
मॅनेजर ओरडत असताना भावनांवर नियंत्रण ठेवा. तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घ्या.
मध्येच बोलू नका. मॅनेजरचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतल्याने गैरसमज टाळता येतात.
ओरडणे हे अनेकदा कामाशी संबंधित असते. ते स्वतःवर वैयक्तिक टीका म्हणून घेऊ नका.
तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर ती प्रामाणिकपणे स्वीकारा आणि सुधारण्याची तयारी दाखवा.
रागाने किंवा उद्धटपणे उत्तर देऊ नका. शांत आणि व्यावसायिक पद्धतीने संवाद साधा.
मीटिंगनंतर शांत वातावरणात मॅनेजरशी बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा.
समस्या कोणामुळे झाली यापेक्षा ती कशी सोडवायची यावर अधिक भर द्या.