Farmer Protest : टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात विश्वभूषण लिमये
ऍग्रो वन

Farmer Protest : टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात

जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती पुरती खालवाल्याच दिसून येत आहे

विश्वभूषण लिमये

सोलापूर : जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती पुरती खालवाल्याच दिसून येत आहे. टोमॅटोला हमीभाव न मिळाल्याने शेतकरी टोमॅटो थेट रस्त्याच्या कडेला फेकून देत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पुणे- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी जागोजागी भलेमोठे टोमॅटोचे ढिगारे पडलेले बघायला मिळतं आहे.

हे देखील पहा-

यामुळे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची दैना झाली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. पंधरवड्यापूर्वी ४० ते ५० रुपये किलो दराने विकणाऱ्या टोमॅटोला आज केवळ चार ते पाच रुपये भाव मिळत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातला टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिलाय.

या लालभडक टोमॅटोचे डोंगरांचा लालभडक चिखल रस्त्यावर पाहायला मिळत आहे. गणपती आणि महालक्ष्मीचा सण संपताच भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका हा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. टोमॅटोची आवक वाढली आणि सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने टोमॅटोला बाजारात भाव मिळत नाही.

दुसऱ्या राज्यात पाऊस पडत असल्यामुळे तिथूनही मागणी कमी झाली आहे. बाजारामध्ये चार ते पाच रुपये किलो असा भाव मिळत असल्याने बाजारात नेऊन गाडीभाडेही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT