Nashik Latest Marathi News, Agriculture News in Marathi Saam Tv
ऍग्रो वन

शेतकऱ्याच्या कांद्यावर वैऱ्याची नजर, युरिया मिश्रीत पाणी टाकल्याने नुकसान

यामुळे शेतकऱ्याचे ७० ते ८० हजारांचे नुकसान

अभिजीत सोनावणे

नाशिक - निसर्गाच्या लहरीपणाला आणि अनियमित वीज पुरवठा असतांना देखील मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांदा (Onion) पिकविला. पण बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना (Farmer) कांदा विक्री न करता चांगला बाजारभाव मिळण्याच्या प्रतिक्षेत कांदा चाळीत साठवण करुन ठेवला. मात्र कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर वैऱ्याची नजर पडली आणि त्याने थेट कांदा चाळीतच युरिया मिश्रीत पाणी टाकल्याने संपूर्ण कांदा नासला. (Nashik Latest Marathi News)

हे देखील पाहा -

यामुळे शेतकऱ्याचे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना लोणवाडे शिवारात घडली आहे. कांदा उत्पादक शेतकरी तुषार भुसे यांची लोणवाडे शिवारात शेती आहे. त्यांनी यंदा मोठ्या कष्टाने कांदा पिक घेतले. मात्र सध्या कांद्याला चांगला बाजारभाव नसल्यामुळे त्यांनी कांदा विक्री न करता चाळीत साठवणूक करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कांदा चाळीत युरिया हे रासायनिक खत टाकल्याने संपूर्ण कांदा खराब होण्याला सुरुवात झाली आहे. यामुळे भुसे यांचे तब्बल ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भुसे यांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करता आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : ओव्हल कसोटीमध्ये राडा! एकटा यशस्वी जैस्वाल इंग्लंडच्या खेळाडूंना भिडला, मैदानात काय घडलं? Video

Family Pension म्हणजे काय रं दादा ? कोणाला मिळतो लाभ? जाणून घ्या सर्व काही

Manikrao Kokate: विधानभवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंवर बच्चू कडूंचा प्रहार|VIDEO

Maharashtra Politics : सरकारचा पैसा आहे, कितीही मागा आपल्या बापाचं काय जातंय; मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य चर्चेत

Maharashtra Live News Update : मिरकरवाडा येथे सुतारकाम करत असलेल्या कामगाराचा खून

SCROLL FOR NEXT