maval news, bitter melon saam tv
ऍग्रो वन

Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; मावळातील शेतक-याने एक एकरातून कमाविले साडेतीन लाख

पिंपरी मार्केटमध्ये नागरिक आवर्जुन कारलं विकत घेतात.

दिलीप कांबळे

Maval News : वडिलोपार्जित पाच एकर शेतीतून टोमॅटो, भात, पालक, कांदा, मिरची, अशी सेंद्रिय पद्धतीने पीक घेणा-या मावळ तालुक्यातील शेतक-याने मार्केटची गरज ओळखून कारल्याचे उत्पादन घेतले आणि त्यातून आर्थिक प्रगती साधली. (Maharashtra News)

मावळ तालुका हा प्रामुख्याने भात शेतीसाठी म्हणून ओळखला जातो. पवन मावळातील थुगाव येथील सुनील पोटफोडे या शेतकऱ्याने पारंपारिक पद्धतीच्या शेतीला बगल देत आधुनिक पद्धतीचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून नगदी पीक घ्यायचे ठरवले. वातावरण तसेच मार्केटची गरज ओळखून कारल्याचे उत्पादन घ्याचे त्याने ठरविले. आपली वडिलोपार्जित पाच एकर शेती त्यांच्याकडे आहे. यात त्यांनी टोमॅटो, भात, पालक, कांदा, मिरची, अशी सेंद्रिय पद्धतीने पीक घेतात.

शेताच्या चारही बाजूने विशिष्ट अंतरावर बांबूचा वापर करत तारा बांधून कारल्याचे वेल त्यावर सोडले. पोटफोडे यांनी तयार केलेल्या कारल्याची थेट पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) मधील शेतकरी कट्ट्यावर विक्री करीत असल्याने त्यांची दलाली पासून सुटका झाली. त्यांच्या सेंद्रिय पद्धतीने केलेल्या कारला पिकाची पिंपरी मार्केटमध्ये नागरिक आतुरतेने वाट बघत असतात.

दरम्यान घरातील सर्व सदस्य कारल पीक काढण्यास मदत केल्यामुळे मजुरीही वाचली. नांगरणी, सपाटीकरण, गादी वाफे, आणि खत यासाठी त्यांना 50 ते 55 हजार रुपये खर्च आला. तीन ते चार महिन्याच्या या कारल्याच्या पिकात त्यांना साडेतीन लाख रुपये उत्पादन मिळणार आहे. पन्नास हजार खर्च वजा करता निव्वळ तीन लाख रुपये त्यांना नफा होण्याची अपेक्षा आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराण-इस्त्रायल युद्धाबाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली? जगात भीतीचं वातावरण

Maharashtra Live News Update: राहत्या घराला भीषण आग; सोन्या- चांदीचे दागिने जळून खाक

युद्धामुळे महागाईचा भडका, पेट्रोलचे दर 135 वर जाण्याची भिती

Mumbai Metro: दहिसर-काशीगाव मेट्रो कधी धावणार,नवी अपडेट आली समोर; १ तासाचा प्रवास होणार फक्त २० मिनिटात

Monday Horoscope : भाग्य उजळणार; धुळवडीच्या दिवशी 5 राशींचे लोक मालामाल होणार, पैसा खेळता राहणार

SCROLL FOR NEXT