कर्ज आणि अतिवृष्टीमुळे संकटाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या जयेश गावंडे
ऍग्रो वन

कर्ज आणि अतिवृष्टीमुळे संकटाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील नष्ट झालेले पीक, आणि डोक्यावर कायम असलेला कर्जाचा डोंगर जणू हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेल आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील नष्ट झालेले पीक, आणि डोक्यावर कायम असलेला कर्जाचा डोंगर जणू हे शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेल आहे. या सर्व जाचाला कंटाळून अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातील दनोरी गावातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यातून वाढता कर्जाचा बोजा यामुळे शेतकऱ्यांची मानसिक स्थिती ढासळत असल्याचे यातून दिसत आहे. गेल्या आठवड्यात राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय. त्याचा फटका राज्यातील बळीराजांना चांगलाच बसला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झालं आहे. अनेकांची शेती वाहून गेली.

हे देखील पहा-

यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुसरीकडे राज्यावर असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे. याशिवाय वातावरण बदलांमुळे पिकांना कीड लागल्याने त्याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे भाजीपाला कवडीमोल भावात विकला जात आहे. दुसरीकडे अनेक शेतकऱ्यांनी पिकांसाठी कर्ज घेतलेलं आहे. या सर्व गोष्टींमुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच अकोट तालुक्यातील ग्राम दनोरी येथील सुरेश श्रीरंग कुटेमाटे यांनी आपल्या राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या केली आहे.

अतिवृष्टी झाल्याने शेतातील पीक पूर्णपणे सडून नष्ट झाले आहे. त्यांच्यावर देखील सोसायटी बँकेचे कर्ज 34 हजार 500 रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच सततची नापिकी आणि येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील महिन्यात येऊन गेलेल्या महापुरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारकडून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून सुरेशने विष घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्यापाठी मागे पत्नी आणि मुलगा आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

Success Story: वडील घरोघरी जाऊन कपडे विकायचे, लेकाने मोठ्या जिद्दीने UPSC क्रॅक केली; IAS अनिल बसाक यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT