शेतकरी वाडा कृषी पर्यटन केंद्र, संकटाच्या काळात शोधली यशाची नवी पायवाट जयेश गावंडे
ऍग्रो वन

शेतकरी वाडा कृषी पर्यटन केंद्र, संकटाच्या काळात शोधली यशाची नवी पायवाट

कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहे. शेतीलाही त्याचा फार मोठा फटका बसला आहे.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : कोरोनामुळे Corona असलेल्या लॉकडाऊनमुळे Lockdown अनेक व्यवसाय Business ठप्प झाले आहे. शेतीलाही त्याचा फार मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये अस्मानी आणि सुलतानी संकटाने अनेक शेतकरी Farmers देशोधडीला लागले आहेत. मात्र, अकोल्या Akola मधील बहादुरा Bahadura या गावातील एका शेतकऱ्याने या सर्व संकटावर मात करत, एक नवी पायवाट शोधली आहे.

बोटीतून फिरण्याचा आंनद घेत असलेले चित्र हे कुण्या मोठ्या पर्यटन Tourism ठिकाणचे नाही. ते हे चित्र आहे. अकोल्या मधील बहादुरा या छोट्या गावामधील आहे. अकोल्यातील बहादुरा येथील शेतकरी विठ्ठल माळी या शेतकऱ्याने आपल्या शेतीत यशाचा एक नवा अध्याय लिहिला आहे. आपल्या पडीक शेतीला agriculture पर्यटन केंद्राची जोड देत. त्यामधून चांगले उत्पन्न ते मिळवत आहेत.

हे देखील पहा-

बहादुरा येथील विठ्ठल माळी यांच्याकडे ३० एकर शेती अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे आधीच शेतीचे अर्थशास्त्र फार कोलमडून गेले आहे. त्यामधेच कोरोनामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहे. या काळात शेतकऱ्याला प्रेरणा मिळाली आहे. ती पर्यटन केंद्र उभारण्याची त्यांच्याकडे असलेल्या शेतीपैकी ५ एकर पडीक शेती मध्ये काहीच पिकत नसल्यामुळे या पडीक शेतीचा उपयोग माळी यांनी कृषी पर्यटन केंद्र उभारून केला आहे.

५ वर्षांपूर्वी या शेतीत मध्ये ५ शेततळे खोदून मत्स्यव्यवसाय Fisheries सुरू करण्यात आला होता. यामधून लॉकडाउन मुळे चांगले उत्पन्न मिळत नव्हते. लॉकडाउनच्या काळात कृषीपर्यटन Agri-tourism केंद्र सुरू करण्याचा संकल्प करत एकामागून एक कल्पना सुचत गेले. बोटींग Boating, स्विमिंग, घोडसवारी, बैलगाडी सवारी, वर्हाडी जेवण असे एक- एक करत त्यांचे कृषीपर्यटन केंद्र सुरू केले आहे.

मागील १५ दिवसांपासून सुरू झालेल्या या शेतकरी वाड्यामध्ये आता हजारोच्या वरती पर्यटकांनी हजेरी लागली आहे. यामुळे माळी यांना यातून चांगले उत्पन्न मिळतं आहे. प्रति व्यक्ती केवळ २०० रुपयांत घोड सवारी, बोटिंग, स्विमिंग, बैलगाडी सवारी, रुचकर वऱ्हाडी जेवण मिळत असल्यामुळे, शहरामधील लोक आता या शेतकऱ्यांच्या पर्यटन केंद्रामध्ये मोठी गर्दी करत आहेत.

अकोल्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर एक चांगले आणि मोठे पीकनिक Picnic चे ठिकाण म्हणून या पर्यटन केंद्रात जात आहेत. अधिकाधिक विकसित होत आहे. पुढच्या काही दिवसांत याठिकाणी निवासासह इतरही अनेक सुविधा निर्माण केले जाणार आहे. सततची नापिकी, अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे आधीच पिचून गेलेल्या, शेतकऱ्यांना विठ्ठल माळी यांनी निर्माण केलेली ही यशाची नवी पायवाट नक्कीच प्रेरणा आणि ऊर्जा देणारी होणार आहे. यातूनच उन्नतीचा मार्ग ही दाखवणारी.. शेतीच अर्थशास्त्र सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना विठ्ठल माळी यांनी शोधलेली ही शक्कल नक्कीच उपयोगी येईल यात शंकाच राहणार नाही.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tourism: किल्ले-धबधब्यांपासून ब्रेक घ्या! पावसाळ्यात मुलांसोबत फिरण्यासाठी ‘ही’ ३ ठिकाणं बेस्ट

Maharashtra Politics: विरोधकांनी 'त्या' विषयाचा बाऊ केला, गुलाबराव पाटील असं का म्हणाले? VIDEO

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

SCROLL FOR NEXT