Electricity Saam Tv
ऍग्रो वन

Agriculture News : रब्बी हंगामात शेतकऱ्यांसमोर विजेची समस्या; पिकांवर परिणाम होण्याची शक्यता

रोहित्रासाठी शेतकऱ्यांना माराव्या लागतात खेट्या...

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन (Soybean) पिकांचे मोठं नुकसान झालं आहे.त्यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला असताना या खचलेला शेतकरी (Farmer) नव्या उमेदीने रब्बी हंगामाची तयारीला सुरवात असताना. रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची मुभलक उपलब्धता असताना सुद्धा विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यारी त्रस्त झाले आहेत.

अनेक ठिकाणी रोहित्र खराब झाले आहेत,तर विजेच्या ताराही अनेक भागात तुटल्या आहेत. त्यांची दुरुस्ती वीज कर्मचाऱ्यांकडून केल्या जात नसल्याने वीज संकटाचा सामना करण्याची वेळ अत्ता शेतकऱ्यावर आली आहे. कधी आस्मानी कधी सुलतानी तर कधी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीजपुरवठा करणारे अनेक ठिकाणचे रोहित्र जळाले आहेत.

रोहित्र भरल्या नंतर ही पुन्हा वारंवार जळत असल्याने महावितरण विभागाच्या रोहित्र भरणाऱ्या विभागाच्या कामकाजावर प्रश्न निर्माण केल्या जात आहे. तर काही भागातील विजेच्या तारा तुटल्या आहेत. त्यामुळे विदूत पुरवठा होत नसल्याने पाणी असूनही शेतकऱ्यांना आपल्या पिकांना पाणी देता येत नसल्यानं. महावितरण कंपनीच्या उदासीन कारभारामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एकीकडे शेकऱ्याला दिवसा लाईट मिळावी अशी घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलीय.मात्र दुसरीकडे दिवसा वीज तर सोडा जळालेले रोहित्र भरून आणल्यानंतर लगेच जळत असल्यानं जळालेले रोहित्र एकदा भरण्यासाठी नेल्यानंतर महिना महिना वाट पाहावी लागत आहे.दुरुस्त केलेल्या रोहित्रावर विद्युत भार वाढत असल्याने ते जळत असल्याचे महावितरण कडून दावा केला जातो. मात्र हे रोहित्र भरणाऱ्या विभागाकडूनचं नादुरुस्त रोहित्र पाठवल्या जात असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केल्या जात आहे. त्यामुळे महावितरण विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्तीत केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एकादशीनिमित्त फुलांनी सजली माऊलींची समाधी

दुसऱ्यांच्या घरी पितरांचे जेवण करणं शुभ की अशुभ? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना हटवा नाहीतर... काँग्रेस आता थेट 'आरपारच्या' भूमिकेत; बघा काय आहे नवा प्लॅन

Weather Update : राज्यात उकाडा वाढला! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे थरार! मिसिंग लिंकवर २ भीषण अपघात; रस्त्यावर लागला केळींचा ढीग

SCROLL FOR NEXT