पावसाअभावी खरीपाची पिके सुकू लागली; बळीराजा चिंतेत! गोविंद साळुंके
ऍग्रो वन

पावसाअभावी खरीपाची पिके सुकू लागली; बळीराजा चिंतेत!

राज्यभरात अतिवृष्टीने व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याचश्या भागात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

गोविंद साळुंके, साम टीव्ही, शिर्डी

शिर्डी : राज्यभरात अतिवृष्टीने व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याचश्या भागात पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. राहाता तालुक्यामध्ये पावसाभावी खरिपाची पिके सुकू लागली आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राहाता तालुक्यात पाऊसच पडला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

हे देखील पहा -

खरीप हंगामाच्या पहिल्या टप्प्यात साधारणतः पाच टक्क्यांच्या आसपास खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या होत्या. मात्र पावसाने तब्बल पंधरा दिवस विश्रांती घेतल्या नंतर हि पिके सुकू लागली आहेत. याच कालावधीनंतर मध्यम स्लावरूपाचा पाऊस या भागात झाला. या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. सोयाबीन, मका, कपाशी, मूग व अन्य पिके जोमात आली.

मात्र आता पुन्हा पावसाने दांडी मारल्याने राहाता तालुक्यातील खरीपातील हि पिके सुकून जाऊ लागली आहेत. दरम्रोयान रोज या भागात ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र, पावसाची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत. येत्या आठवड्याभराच्या काळात पाऊस झालाच नाही तर जोमात आलेली हि पीके वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

Pre wedding shoot Locations: परदेशात जाण्याची गरज नाही! भारतातील 5 सुंदर - रोमँटिक ठिकाणे; प्री-वेडिंग शूटसाठी ठरतील बेस्ट

DA Hike : महागाई भत्त्यात वाढ; लाखो कामगारांच्या बेसिक सॅलरीतही वाढ, ऑक्टोबरपासून नवे दर लागू

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

SCROLL FOR NEXT