Dhule News Saam tv
ऍग्रो वन

Dhule News: शेतकऱ्याने तापी नदीत उडी मारत संपविले जीवन

Shirpur News शेतकऱ्याने तापी नदीत उडी मारत संपविले जीवन

Rajesh Sonwane

शिरपूर (धुळे)  : सावळदे (ता. शिरपूर) येथील पुलावरून तापी नदीत उडी टाकत वृद्ध शेतकऱ्याने (Farmer) आत्महत्या केली. ही घटना २९ ऑगस्टला दुपारी घडली. (Dhule) रात्री उशिरा शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. (Breaking Marathi News)

पुलावरून तापी नदीत उडी टाकताना वृद्धाला महामार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी पाहिले. त्यांनी आरडाओरडाही केला. मात्र त्याच्यापर्यंत पोचण्याच्या आतच वृद्धाने नदीत उडी टाकली. मंगळवारी दुपारी तीनला ही घटना घडली. त्यानंतर पोलिसांना सूचित करण्यात आले. त्यांनी सावळदे येथील मच्छीमारांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली. 

दरम्यान, पुलावर वृद्धाचे मतदान ओळखपत्र व टोपी आढळली. त्यावरून मृत शेतकरी चिंधू दामू चौधरी (वय ७३) असून ते भोरटेक (ता. शिरपूर) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. रात्री उशिरापर्यंत शोध सुरू ठेवल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. हवालदार प्रमोद ईशी तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp Storage: WhatsApp फोटो-व्हिडिओमुळे स्टोरेज भरते? 'ही' सेटिंग लगेच ऑफ करा

Maharashtra Live News Update: ऍलोपॅथिक डॉक्टर संघटनांचा आज संप, राज्यात 24 तास आरोग्य सेवा बंद

Suraj Chavan : सूरज चव्हाणचं गुलीगत लग्न ठरलं? 'तिच्या'सोबतचा खास फोटो केला शेअर, म्हणाला "स्वप्न नाही..."

Local Power Block : मध्य रेल्वेवर ४ दिवसांचा विशेष मेगा ब्लॉक, नेरळ-कर्जत-खोपोली मार्गावर फटका, वाचा कोणकोणत्या ट्रेन रद्द

Fact Check: AI साडी ट्रेंड शरीराचे फोटो चोरतोय? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT