Cotton Theft Saam tv
ऍग्रो वन

Cotton Theft: शेतकऱ्याला धमकी देऊन कापसाची चोरी

साम टिव्ही ब्युरो

शिरपूर (धुळे) : शेतकऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन खळ्यातीळ शेळमध्ये ठेवलेला सहा क्विंटल कापूस (Dhule) चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना २५ डिसेंबरला मध्यरात्रीच्या सुमारास अर्थे (ता.शिरपूर) येथे घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली असून (Farmer) शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. (Breaking Marathi News)

शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील शेतकरी सुभाष हरी बडगुजर हे २४ डिसेंबरला रात्री अर्थे गावापुढे शहादा रस्त्यावर असलेल्या शेतातील खळ्यात झोपले होते. खळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांच्या शेतातील कापूस भरून ठेवला होता. मध्यरात्री तोंडावर रुमाल बांधलेले चार संशयित खळ्यात शिरले. त्यातील एकाने बडगुजर यांचे हात धरले तर दुसऱ्याने पायावर बसून ‘चिल्लाओ मत, वरना मार डालूंगा’ अशी धमकी दिली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यानंतर उर्वरित दोघांनी खळ्यातील शेडमधून सुमारे सहा क्विंटल कापूस चोरून सोबत आणलेल्या वाहनात भरला. त्यानंतर संशयित पसार झाले. बडगुजर यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी धावून आले. मात्र तोपर्यंत संशयित अंधारात फरार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ए.एस. आगरकर व शोधपथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बडगुजर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात संशयित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

SCROLL FOR NEXT